prescription, Google's New Feature Sakal
विज्ञान-तंत्र

Google's New Feature: डॉक्टरांचे हँडराइटिंग समजत नाही? गुगल आणणार अफलातून फीचर

टेक दिग्गज कंपनी Google ने नुकतेच Google for India 2022 इव्हेंटचे आयोजन केले होते. या इव्हेंटमध्ये कंपनीने एआयशी संबंधित अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Google for India 2022 Event: टेक दिग्गज कंपनी Google ने नुकतेच Google for India 2022 इव्हेंटचे आयोजन केले होते. या इव्हेंटमध्ये कंपनीने वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित अनेक घोषणा केल्या आहेत. याशिवाय, कंपनी लवकरच इतर नवीन फीचर्स देखील जारी करणार आहेत. कंपनीने AI शी संबंधित देखील मोठ्या घोषणा केल्या आहेत. विशेष म्हणजे कंपनी आता डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे ओळखण्यास मदत करणार आहे.(Google's New Feature)

अनेकदा डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे कोणती आहेत, हे हँडरायटिंगमुळे लक्षात येत नाही. मात्र, गुगलच्या मदतीने डॉक्टरांनी काय लिहून दिले आहे, हे ओळखणे सोपे होईल.

हेही वाचा: असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

कंपनीने माहिती दिली, 'डॉक्टरांनी औषधांच्या चिठ्ठीवर काय लिहिले आहे हे ओळखता यावे यासाठी प्रयत्न करत आहोत. एआयचा वापर करून चिठ्ठीवर काय लिहिले आहे, हे सहज समजेल.' सध्या या फीचरचे टेस्टिंग सुरू असून, यूजर्ससाठी रोल आउट करण्यात आलेले नाही. हे फीचर रोलआउट झाल्यानंतर यूजरला चिठ्ठीचा फोटो काढून अपलोड करता येईल. यानंतर चिठ्ठीवर लिहिलेल्या औषधांची संपूर्ण माहिती मिळेल.

मेडिकल क्षेत्रात या टेक्नोलॉजीची मदत होईल. अनेकदा डॉक्टरांनी काय लिहिले आहे हे वाचून गोंधळ उडतो. अशावेळी याचा उपयोग होईल. मात्र, केवळ टेक्नोलॉजीने दिलेल्या माहितीवर अवलंबून राहू नये, असेही कंपनीने म्हटले आहे.

दरम्यान, गुगल आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर (AI) रिसर्च करण्यासाठी संस्थेला १ मिलियन डॉलर म्हणजे ८.२५ कोटी रुपयांपेक्षा अधिक अनुदान देणार आहे. या अनुदानाद्वारे भारतातील पहिले मल्टी-डिसिप्लेनरी सेंटर स्थापन केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं भोवलं, ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

Ayodhya Ram Temple security upgrade: राम मंदिरासह महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेला बळ; महिला स्नायपर्स, PAC बटालियन आणि गनर्ससाठी अत्याधुनिक शस्त्रसाठा मंजूर

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Latest Marathi News Update : अमित शहा शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार, हुपरीत जंगी कार्यक्रम

SCROLL FOR NEXT