google soon ban call recording apps android phone users will not be able to record calls
google soon ban call recording apps android phone users will not be able to record calls  
विज्ञान-तंत्र

Android 14 : आता मोबाईल टॉवर विसरा थेट सॅटेलाईटवरुन होणार संवाद; गुगलची तयारी सुरु

सकाळ डिजिटल टीम

वॉशिंग्टन : स्मार्टफोन्स किंवा इतर कुठल्याही मोबाईल्सच्या कनेक्टिव्हिटीसाठी आपल्याला मोबाईल टॉवरची गरज भासते. पण आता हे तंत्रज्ञान इतिहासात जमा होणार आहे. यापुढे थेट अवकाशातील सॅटेलाईटच्या मार्फत मोबाईलवर संवाद साधता येणार आहे. यासाठी गुगल कंपनीनं काम सुरु केलं असून आपल्या लेटेस्ट अॅन्ड्रॉईड १४ या ऑपरेटिंग सिस्टिमसाठी हा सॅटेलाईट कम्युनिकेशन सपोर्ट देण्यावर गुगल सध्या काम करत आहे. (Google working to build satellite communication support for Android 14)

स्पेसक्राफ्ट इंजिनिअरिंग कंपनी स्पेसेक्स (Space X) आणि टी मोबाईल (T-Mobile) या दोन कंपन्यांनी नुकतीच पार्टनरशिपची घोषणा केली. यामुळं आता स्मार्टफोन्स हे थेट सॅटेलाईटशी जोडले जाणार आहेत. GSM अरेनाच्या माहितीनुसार, आगामी स्टारलिंक व्ही २ सॅटेलाईट्सशी मोबाईल फोन्सचा सपोर्ट असणार आहे. हे नवं तंत्रज्ञान सध्याच्या स्मार्टफोन्सवरही चालू शकणार आहे, कारण ते सध्याच्या बँडविड्थवर अर्थात PCS स्पेक्ट्रमवर वापरलं जाणार आहे.

या नव्या तंत्रज्ञानाबाबत Google SVP of Platforms & Ecosystems Hiroshi Lockheimer नं Twitter वर घोषणा केली की, कंपनी Android (v14) च्या पुढील आवृत्तीमध्ये सॅटेलाइट कम्युनिकेशन सपोर्ट तयार करण्यावर काम करत आहे. तसेच सध्याच्या फोनमधील रेडिओ हार्डवेअर हे काम करेल, GSM Arena नुसार, यासाठी कुठल्या सॉफ्टवेअरचं अपडेट आवश्यक असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

T-Mobile आणि Space X ने 2023 च्या उत्तरार्धात जेव्हा Android 14 बाजारात आणतील, तेव्हा नवीन उपग्रहाची बीटा चाचणी सुरू करण्यात होऊ शकते. सुरुवातीला याची सेवा फक्त अमेरिकेपुरती असेल पण नंतर संपूर्ण जगभरात ही सेवा विस्तारित होणार आहे. सुरुवातीला याचा स्पीड कमी असेल तर जो प्रतिसेल्युलर झोन सुमारे 2 ते 4Mbps असेल परंतू शेकडो हजारो मेसेज पाठवण्यासाठी ते पुरेसे आहे. फक्त साधे एसएमएसच नाही तर MMS लाही ते सपोर्ट करेल तसेच इतर मेसेजिंग अॅपलाही ते सपोर्ट करेल. आपत्कालीन परिस्थितीत आणि दुर्गम भागासाठी ही सेवा उत्तम आहे, असं GSM अरेनाने अहवालात म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल प्रकरणी विभव कुमार यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

Aye Haye Oye Hoye Viral Song: जे गाणं ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनी कानावर ठेवले हात, त्याचं ओरिजनल व्हर्जन आहे भन्नाट

Indian Team Coach : द्रविड, लक्ष्मणनंतर ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गजाचाही नकार; हेड कोच निवडताना बीसीसीआयची वाढणार डोकेदुखी?

Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

SCROLL FOR NEXT