CERT Warning Android 13 eSakal
विज्ञान-तंत्र

CERT Warning : अँड्रॉईड 11, 12, 13 वापरताय तर सावधान! केंद्र सरकारने दिला धोक्याचा इशारा, त्वरीत करा 'हे' काम

Android 13 Warning : अँड्रॉईड 11, अँड्रॉईड 12, अँड्रॉईड 12L आणि अँड्रॉईड 13 या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये त्रुटी आढळल्या आहेत.

Sudesh

अँड्रॉईड फोन वापरणाऱ्यांना केंद्र सरकारने एक मोठा इशारा दिला आहे. आयटी अँड इन्फॉर्मेशन मंत्रालयाच्या कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT) याबाबत माहिती दिली आहे. अँड्रॉईड 13 आणि त्याहून जुन्या ऑपरेटिंग सिस्टीम असणाऱ्या यूजर्सच्या मोबाईलमध्ये कित्येक त्रुटी समोर येऊ शकतात असं यामध्ये म्हटलं आहे.

या त्रुटींमुळे हॅकर्स मोबाईलमध्ये आरामात शिरकाव करु शकतात. त्यामुळे यूजर्सची गोपनीय माहिती आणि बँक डीटेल्स देखील चोरी होण्याची शक्यता आहे. यामुळेच सरकारने तातडीने आपल्या फोनमधील ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट करुन घेण्याचा इशारा दिला आहे.

कोणत्या मोबाईलला धोका?

CERT ने दिलेल्या माहितीनुसार; अँड्रॉईड 11, अँड्रॉईड 12, अँड्रॉईड 12L आणि अँड्रॉईड 13 या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये त्रुटी आढळल्या आहेत. यापूर्वीच्या ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या मोबाईलना देखील धोका असल्याचं म्हटलं आहे. गुगलने एका नवीन अपडेटमध्ये या त्रुटी दुरुस्त केल्याचं म्हटलं आहे. अर्थात, त्यासाठी यूजर्सना आपला फोन अपडेट करून घेणं गरजेचं आहे.

स्मार्टफोनला ठेवा सुरक्षित

  • स्मार्टफोनला हॅक होण्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी वेळोवेळी सॉफ्टवेअर अपडेट करुन घेणं गरजेचं आहे. तसंच वेळोवेळी येणारे सिक्युरिटी पॅचेस देखील इन्स्टॉल करणं गरजेचं आहे.

  • नवीन अ‍ॅप्स घेताना ते शक्यतो गुगलच्या प्ले-स्टोअरवरुन घ्यावेत. किंवा मग तुम्ही आयफोन वापरत असाल तर अ‍ॅप स्टोअरवरुन नवीन अ‍ॅप घ्यावेत. थर्ड पार्टी अ‍ॅप घेणं टाळावं.

  • मेसेजवर आलेल्या कोणत्याही लिंक्सवर क्लिक करणं टाळावं. या माध्यमातून देखील फोनमध्ये मालवेअर येऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: ट्रम्पच्या धमकीनंतर बाजारात धुमाकूळ! 1 मिनिटातच सेन्सेक्स 1500 अंकांनी कोसळला; कोणते शेअर्स तोट्यात?

Sports News: नाशिकचा हर्षवर्धन केसरी विजेता; महाराष्ट्र केसरी कुस्ती;सोलापूरचा महेंद्र गायकवाड पुन्हा उपविजेता

Latest Marathi News Live Update : आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे मच्छिमारांसाठी सवलतीच्या डिझेलवर परिणाम

Nagpur Accident: राज्यात रस्ते अपघातात वर्षभरात १५ हजार ५४९ नागरिकांचा मृत्यू; अपघातांच्या घटना वाढल्या, २०२४ मध्ये १५ हजार ७१५ मृत्यू!

Jyotiba Temple Incident : जोतिबा डोंगरावर हायव्होल्टेज ड्रामा! बिगर सासनकाठी घेऊन आलेल्या मद्यधुंद तरुणांनी थेट पुजाऱ्यांवरच उगारला हात; पहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT