Mobile Hacking  eSakal
विज्ञान-तंत्र

Mobile Hacking : OTT अ‍ॅप्स डाऊनलोड करताना खबरदारी गरजेची; नवीन मालवेअर करतोय अँड्रॉईड मोबाईलवर हल्ला! सरकारचा इशारा

Malware : एक नवीन मालवेअर सध्या अँड्रॉईड मोबाईलवर हल्ला करत आहे.

Sudesh

केंद्र सरकारने देशभरातील अँड्रॉईड यूजर्सना एक इशारा दिला आहे. एक अ‍ॅडव्हान्स मालवेअर अटॅक सध्या भारतातील कित्येक मोबाईलवर हल्ला करत आहे. ओटीटी अ‍ॅप्सच्या माध्यमातून हा मालवेअर फोनमध्ये येत असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे.

यामुळेच सरकारने देशातील स्मार्टफोन यूजर्सना खबरदारीचा इशारा दिला आहे. नवीन अ‍ॅप डाऊनलोड करताना किंवा इंटरनेट सर्फ करत असताना काळजी घेण्याचं आवाहन देखील सरकारने केलं आहे.

कोणता आहे मालवेअर?

सुरक्षा मंत्रालयाच्या एका विभागाने याबाबत अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. DogRAT नावाचा हा एक रिमोट अ‍ॅक्सेस ट्रोजन मालवेअर असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे. हा मालवेअर आपल्या फोनमध्ये आल्यास आपले बँकिंग क्रेडेन्शिअल्स, फोटो, कीस्ट्रोक्स (तुम्ही जे टाईप करता तो डेटा), मेसेज आणि इतर बरीच माहिती चोरू शकतो. सोबतच तुम्हाला ट्रॅक करून, तुमचा ऑडिओ देखील रेकॉर्ड करू शकतो असं सरकारने सांगितलं आहे.

फेक अ‍ॅप्सच्या माध्यमातून हल्ला

हा मालवेअर व्हॉट्सअ‍ॅप, चॅटजीपीटी, ऑपेरा मिनी ब्राऊजर, नेटफ्लिक्स, यूट्यूब अशा कित्येक अ‍ॅप्सच्या माध्यमातून आपल्या स्मार्टफोनमध्ये येऊ शकतो. अशा अ‍ॅप्सचे फेक व्हर्जन तयार करुन, त्या माध्यमातून यूजर्सच्या फोनवर हल्ला करण्याचे प्रकार समोर आल्याचं सरकारने सांगितलं आहे.

काय घ्यावी खबरदारी

मोबाईलमध्ये व्हायरस किंवा मालवेअर येऊ नये यासाठी नवीन अ‍ॅप्स घेताना केवळ प्ले-स्टोअरवरुन घेणं गरजेचं आहे. इतर वेबसाईटवरुन किंवा थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मवरून अ‍ॅप्स घेणं टाळावं. तसंच आपल्या फोनचं सॉफ्टवेअर कायम अपडेट ठेवावं. आपल्या मोबाईल किंवा अन्य डिव्हाईसमध्ये अँटीव्हायरस सॉफ्टवेअर घेतल्यास देखील सायबर हल्ल्यापासून बचाव होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT