GTA 6 Trailer eSakal
विज्ञान-तंत्र

GTA 6 Trailer : अखेर 'जीटीए-6'चा ट्रेलर समोर; कशी आहे रॉकस्टारची नवी गेम? पाहा व्हिडिओ

Online Games : ग्रँड थेफ्ट ऑटो, म्हणजे जीटीए गेम्सचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत.

Sudesh

Rockstar Games Launches GTA 6 Trailer : रॉकस्टार गेम्सने अखेर आपल्या बहुप्रतिक्षित ग्रँड थेफ्ट ऑटो 6 या गेमचा ट्रेलर प्रसिद्ध केला आहे. आज (5 डिसेंबर) सायंकाळी हा ट्रेलर प्रदर्शित होणार होता. मात्र, त्यापूर्वीच ऑनलाईन लीक झाल्यामुळे कंपनीने वेळेपूर्वीच यूट्यूबवर हा ट्रेलर प्रदर्शित केला. आतापर्यंत या ट्रेलरला दोन कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

ग्रँड थेफ्ट ऑटो, म्हणजे जीटीए गेम्सचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. 2013 साली या GTA 5 लाँच करण्यात आली होती. तेव्हापासूनच गेमर्स आता पुढचं व्हर्जन कधी येतं याची प्रतीक्षा करत होते. अखेर जीटीए 6 कधी येणार हे ट्रेलरमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

कधी होणार रिलीज?

GTA 6 ही गेम 2025 साली रिलीज होणार असल्याचं ट्रेलरमध्ये शेवटी सांगण्यात आलंय. ही गेम प्लेस्टेशन 5, एक्सबॉक्स सीरीज एक्स आणि सीरीज एस यावर खेळता येणार आहे. कम्प्युटरवर ही गेम खेळता येईल की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे पीसी गेमर्सची चिंता वाढली आहे.

कसा आहे ट्रेलर?

GTA VI गेमचा ट्रेलर पाहूनच या गेमची भव्यता लक्षात येत आहे. अतिशय हाय क्वालिटी ग्राफिक्स आणि एक नवं मोठं जग यात दिसत आहे. आतापर्यंत लीक्समध्ये समोर आलेल्या कित्येक गोष्टी खऱ्या असल्याचं देखील ट्रेलर पाहून स्पष्ट झालं आहे. (Gaming News)

पहिली फीमेल प्रोटॅगनिस्ट

जीटीए 6 ट्रेलरमध्ये या गेम सीरीजमधील पहिली फीमेल प्रोटॅगनिस्ट लुसिया देखील आपल्याला पहायला मिळते. ट्रेलरच्या सुरुवातीला ती तुरुंगात दाखवली आहे. यानंतर पुढे देखील ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत व्हाईस सिटीमध्ये दिसत आहे. होय! जीटीए 6 गेमच्या मॅपमध्ये व्हाईस सिटी देखील जोडण्यात आली आहे. यामुळे गेमर्सना ही नवी गेम खेळताना GTA Vice City खेळतानाचे जुने दिवस देखील आठवणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ठाकरेंचं चॅलेंज फडणवीसांनी स्वीकारलं; म्हणाले, एक लाख रुपये जिंकलो!

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! पुणे, दौड, काष्टी रुळाचे काम होणार; नागपूर-पुणे मार्गावरील गाड्या झाल्या रद्द..

Nashik Grapes Export : नाशिकच्या द्राक्षांचा परदेशात डंका! नेदरलँड अन् जर्मनीसाठी पहिली ३० टनांची खेप रवाना

Chhatrapati Sambhajinagar News : शहर पर्यटन वाढीला आडकाठी! नियोजित पर्यटन धोरण वर्षभरापासून रखडले

Bigg Boss Marathi 6 Video : "तुझं तोंड शेणात घाल"; पहिल्याच दिवशी रुचिता-तन्वीमध्ये जुंपली !

SCROLL FOR NEXT