Gwalior Student Drone Video : ग्वाल्हेरमधील एका हायस्कूल विद्यार्थ्याने स्वबळावर तयार केलेल्या एक सीट असलेल्या ड्रोनने सर्वांचे लक्ष वेधले आहे. हा ड्रोन ८० किलो वजनाचा माणूस जवळपास ६ मिनिटे हवेत उडवू शकतो. विशेष म्हणजे, हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्याने फक्त तीन महिने घेतले.
मेधांश त्रिवेदी या तरुण विद्यार्थ्याने तीन महिन्यांत हा अनोखा ड्रोन बनवला आहे. त्याच्या या कर्तृत्वाची दखल घेऊन प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रांनी त्याला सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत.
महिंद्रांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “हे यंत्र बनवण्याचे तंत्रज्ञान इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे. मात्र, मेधांशची अभियांत्रिकीची आवड, काम पूर्ण करण्याचा ध्यास आणि मेहनत खूप महत्त्वाची आहे. असे युवा मन आम्हाला अधिक नाविन्यपूर्ण आणि प्रगत राष्ट्र बनवू शकतात.”
सामाजिक माध्यमांवर कौतुकाचा वर्षाव
सोशल मीडियावरही मेधांशच्या या नवकल्पनात्मक प्रकल्पाचे कौतुक होत आहे. एका युजरने म्हटले आहे, “नावीन्य हा केवळ ज्ञानावर अवलंबून नसतो, तर तो जिद्द, समर्पण आणि कल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असतो. असे युवा मन देशाच्या प्रगतीचा पाया रचतात.”
इतर अनेकांनी मेधांशच्या या ड्रोन प्रकल्पाला “अत्यंत प्रभावी” असे संबोधले आहे. मेधांश त्रिवेदीसारख्या तरुणांच्या उपक्रमशीलतेमुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला नवी दिशा मिळू शकते. त्याच्या या यशाने सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, हे निश्चित!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.