hero electric scooter does not require a license runs 85km in signal charge check price  
विज्ञान-तंत्र

हिरोचे इलेक्ट्रिक स्कूटर, एका चार्जमध्ये धावते 85 किमी; पाहा किंमत

सकाळ डिजिटल टीम

भारतात इलेक्ट्रिक स्कूटर(Electric Scooter) ची मागणी आणि विक्री दोन्ही वाढत आहे. या दरम्यान हीरो इलेक्ट्रिक ही देशातील सर्वात जास्त विक्री होणारी इलेक्ट्रिक दुचाकी कंपनी आहे. कंपनीकडे विविध फीचर्स आणि रेंज असलेले अनेक ऑप्शन्स आहेत. या स्कूटरपैकी एक म्हणजे हिरो एडी (Hero Eddy). विशेष म्हणजे ही स्कूटर चालवण्यासाठी लायसन्सचीही गरज पडत नाही. याशिवाय स्कूटरमध्ये तुम्हाला 85 किलोमीटरपर्यंतची रेंज मिळते.

किंमत किती आहे?

याच महिन्यात भारतीय बाजारात सादर करण्यात आली आहे. ही एक लो-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे, ज्यामुळे त्याला रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही किंवा वाहन चालवण्यासाठी लायसेंसची आवश्यकता नाही. 72,000 रुपये एक्स-शोरूम किमतीची, ही स्कूटर FAME सबसिडी अंतर्गत समाविष्ट नाही. तसेच हे स्कूटर दोन कलर - पिवळा आणि टील ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे

या स्कूटरचा टॉप स्पीड फक्त 25 किमी प्रतितास इतकी मर्यादित आहे आणि मोटर खूपच लहान आहे. मात्र स्कूटर पूर्ण चार्ज केल्यावर 85 किमी पर्यंत धावण्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे कमी अंतरासाठी खूप उपयोगी ठरु शकते. बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 3 ते 4 तास लागतात.

फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यात रिव्हर्स मोड, फॉलो मी हेडलॅम्प, ई-लॉक, फाईंड माय बाईक असे फीचर्स देण्यात आले आहेत. यात डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील आहे. फोन चार्ज करण्यासाठी यात यूएसबी पोर्ट दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bernard Julien Passes Away : वर्ल्ड कप विजेत्या अष्टपैलू खेळाडूचे निधन; फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या डोक्याचा वाढवलेला ताप

पूरग्रस्त भागाचा दौऱ्यावेळी भाजप खासदार-आमदारावर हल्ला, रुग्णालयात उपचार सुरू

Diwali 2025 Home Makeover: दिवाळीपूर्वी घराला रंग देताय? मग वास्तूनुसार 'या' शुभ रंगांची करा निवड

Latest Marathi News Live Update : अपघातावेळी गौतमी पाटील वाहनात नव्हती, पुणे पोलिसांच्या तपासातून अंतिम माहिती

विनोद खन्नांचा मृत्यू कसा झालेला माहितीये? ६ वर्ष जगापासून लपवलेलं ते सत्य; एकटेच कुढत काढलेले दिवस, अखेर...

SCROLL FOR NEXT