Honda 125 cc
Honda 125 cc  
विज्ञान-तंत्र

Honda Shine 125cc ची अनोखी शाईन! ठरली 1 कोटी ग्राहकांची पहिली पसंत

सकाळ डिजिटल टीम

होंडा मोटरसाइकिल अँड स्कूटर इंडिया प्राइवेट लिमिटेड (Honda Motorcycle & Scooter India Pvt Ltd) ने एक मोठा टप्पा गाठला आहे. 125 सीसी बाइक्समध्ये होंडा शाइनने सर्व कंपन्यांना मागे टाकले असून आता Honda 125cc सेगमेंटमधील नंबर एकचा ब्रँड बनला आहे, ज्याला 1 कोटी ग्राहकांची पसंती मिळाली आहे. या यशासह कंपनीने नवा विक्रम केला आहे.

एक कोटी ग्राहक असलेली पहिली 125 cc बाईक

कंपनीच्या म्हणण्यानुसार, या बाईकची सतत वाढणारी मागणी पूर्ण करून, 50% पेक्षा जास्त मार्केट शेअरसह शाईन हा ब्रँड अव्वल स्थानावर आहे. 125cc सेगमेंटमध्ये ग्राहकांची पहिली पसंत निवड 29% वर्ष-दर-वर्ष वाढीसह (SIAM नुसार YTD डेटा) शाइन आता एक कोटी ग्राहकांपर्यंत पोहचणारा पहिला 125cc मोटरसायकल ब्रँड बनला आहे. यी मोटारसायकलमध्ये मिळणारे 125 सीसी इंजिन 7,500 rpm वर 72 bhp पॉवर आणि 6,000 rpm वर 10.9 Nm पीक टॉर्क जनरेट करते. तसेच हे इंजिन पाच-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

शाइनवर लोकांचे प्रचंड प्रेम..

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अत्सुशी ओगाटा म्हणाले की, “शाइनला गेल्या काही वर्षांमध्ये मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे आम्ही नम्र झालो आहोत. 2022 मध्ये भारत आश्चर्यकारक वेगानेपुढे जात आहे. आम्ही नवीन आव्हाने पेलण्यासाठी आणि आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम उत्पादनांसह आनंद देण्यासाठी वचनबद्ध आहोत. Honda Motorcycle & Scooter India परिवाराच्या वतीने, मी आमच्या ग्राहकांचे शाइन ब्रँडवर अमूल्य विश्वास ठेवल्याबद्दल त्यांचे आभार मानू इच्छितो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणात ट्विस्ट, दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांनी मागे घेतला जामीन अर्ज

Bollywood News: व्हॅनिटी व्हॅन, स्टायलिस्ट अन् भरमसाठ फी! फिल्मस्टारवर एका दिवसाला किती पैसे होतात खर्च? वाचून व्हाल थक्क

Video: मुलं आजूबाजूला खेळतायेत अन् कपल्सचा पार्कच्या मधोमध 'रोमान्स'; व्हिडिओ पाहून लोकांचा संताप

Latest Marathi News Live Update : स्मृती इरानी यांच्या विरोधात काँग्रेस नेत्याचा अर्ज दाखल

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

SCROLL FOR NEXT