Online pdf file esakal
विज्ञान-तंत्र

Online pdf file डाऊनलोड करताना काय काळजी घ्याल?

महत्त्वाची कागदपत्रंही डिजीटली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचवली जातात. त्यामुळे पीडीएफ फाइल्स आपल्या जीवनात अत्यावश्यक बनल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Online pdf file : आजकाल सर्व महत्त्वाची कामं ऑनलाईन होत असतात. म्हणजे अगदी शाळा, कॉलेपासून ते कार्यालयीन कामापर्यंत सारं ऑनलाईन आहे. महत्त्वाची कागदपत्रंही डिजीटली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचवली जातात. त्यामुळे पीडीएफ फाइल्स आपल्या जीवनात अत्यावश्यक बनल्या आहेत.

या फाईल्सचा उपयोग आधार कार्ड आणि डिजिटल स्लिप यांसारखी विविध प्रकारची माहिती शेअर आणि संग्रहित करण्यासाठी केला जातो. पण अशातच सायबर गुन्ह्यांशी संबंधित काही धोक्यांमुळे PDF फाइल्स डाउनलोड करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

पीडीएफ ऑनलाइन उपलब्ध असलेल्या सर्वात मोठ्या डेन्जरस फाईल्सपैकी एक आहेत. अननोन सोर्सकडून आलेला PDF डाउनलोड केल्याने तुमचा फोन मालवेअर किंवा इतर व्हायरसनी हॅकही होऊ शकतो. अशावेळी काय काळजी घ्यायला हवी ते जाणून घेऊ.

PDF फायल्समध्ये व्हायरस किंवा मालवेअर असू शकतात जे तुमच्या कम्प्यूटर किंवा मोबाइल डिव्हाइसला हानी पोहोचवू शकतात. म्हणूनच तुम्ही डाऊनलोड केलेली कोणतीही PDF फाईल उघडण्यापूर्वी अँटीव्हायरस सॉफ्टवेअरच्या मदतीने स्कॅन करणं खूप महत्त्वाचे आहे. त्याच्या मदतीने डिव्हाइसला व्हायरस किंवा मालवेअरपासून वाचवता येते.

जेव्हा तुम्ही पीडीएफ फाइल्स डाउनलोड करता, तेव्हा त्या अधिकृत अर्थात ऑथेंटिक सोर्सकडून आल्या असणं खूप महत्त्वाचं असतं. याचा अर्थ तुमचा विश्वास असलेल्या सोर्सेसवर व्हायरस आणि मालवेअर इंजेक्ट होण्याची शक्यता कमी आहे. अनधिकृत स्रोत आणि इंटरनेटवरून PDF डाउनलोड करताना, तुम्ही खूप सावध असले पाहिजे. इंटरनेटवर अनेक वेबसाइट्स आहेत, परंतु त्या सर्व सुरक्षित नाहीत. पीडीएफ डाउनलोड करताना जोखीम कमी करण्यासाठी, अधिकृत वेबसाइट, विश्वासू सोर्स किंवा प्रसिद्ध प्लॅटफॉर्मवरून फायल्स डाउनलोड करा. (Technology News)

इंटरनेट वापरताना आणि पीडीएफ फाईलच्या लिंकवर क्लिक करताना क्लिकची काळजी घ्या. पीडीएफ फाइल्स डाउनलोड करण्याच्या नावाखाली अनेक वेळा बनावट लिंक्सवर क्लिक होते, ज्यामुळे हॅकर्सना थेट तुमच्या डिव्हाइसमध्ये प्रवेश घेता येईल. सुरक्षित राहण्यासाठी, पीडीएफमधील लिंक्स विश्वासार्ह असल्याची तुम्हाला खात्री असल्यासच क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT