Spam Call Blocking Tips esakal
विज्ञान-तंत्र

Spam Call Block : मिनिटांत कायमचे बंद करा फसवे स्पॅम कॉल; तुमच्या मोबाईलमध्ये लपलेलं 'हे' फीचर वापरून बघाच

Spam Call Blocking Tips : सतत येणारे स्पॅम कॉल्स आता रोखता येणार आहे. अँन्ड्रॉईड फोनमध्ये कॉल्स ब्लॉक करण्याचे सोपे आणि प्रभावी मार्ग जाणून घ्या.

Saisimran Ghashi

Spam call block helpline : सतत येणारे फसवे स्पॅम कॉल्स म्हणजे आजच्या स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी मोठा त्रासदायक अनुभव ठरतो आहे. टेलिमार्केटिंग, रोबोकॉल्स आणि स्कॅम कॉल्समुळे केवळ वैतागच नव्हे तर फसवणुकीची शक्यताही वाढते. यावर कायमचा उपाय म्हणून Android फोनमध्ये स्पॅम कॉल्स ब्लॉक करण्यासाठी काही सोपे पण प्रभावी उपाय आहेत. चला तर पाहूया..

राष्ट्रीय DND रजिस्टरमध्ये नंबर नोंदवा

जास्तीत जास्त प्रमोशनल कॉल्स टाळण्यासाठी तुम्ही NCPR (National Customer Preference Register) मध्ये आपला नंबर नोंदवू शकता. याआधी हे NDNC नावाने ओळखले जात होते.

  • SMS अ‍ॅप उघडा आणि “START” असा मेसेज 1909 या नंबरवर पाठवा.

  • प्रत्युत्तरादाखल, विविध श्रेणींची यादी (जसे बँकिंग, हॉस्पिटॅलिटी) आणि त्यांचे कोड मिळतील.

  • तुम्हाला कोणते कॉल्स ब्लॉक करायचे आहेत त्यासाठी योग्य कोड रिप्लाय करा.

  • २४ तासांत DND सेवा अ‍ॅक्टिव्ह होईल.

ही सेवा बँकिंगसारख्या महत्त्वाच्या अ‍ॅलर्ट्सवर परिणाम न करता स्पॅम कॉल्स रोखते.

कंपन्यांमार्फत DND सेवा सुरू करा

तुमच्या मोबाईल नेटवर्क प्रदात्याच्या अ‍ॅप किंवा वेबसाइटवरूनही DND सेवा सुरू करता येते

  • Jio-MyJio अ‍ॅप > Settings > Service Settings > Do Not Disturb

  • Airtel- airtel.in/airtel-dnd वर जा

  • Vi (Vodafone Idea)- discover.vodafone.in/dnd

  • BSNL- "start dnd" हा मेसेज 1909 वर पाठवा

स्पॅम नंबर मॅन्युअली ब्लॉक करा

कधीकधी काही विशिष्ट नंबर वारंवार कॉल करतात. अशावेळी त्यांना थेट ब्लॉक करा

  • फोन अ‍ॅप उघडा आणि Call History मध्ये जा

  • स्पॅम नंबरवर Long Press करा

  • "Block" किंवा "Report" पर्याय निवडा

मात्र लक्षात ठेवा, स्पॅम कॉलर्स वारंवार नंबर बदलत असल्याने हे उपाय तात्पुरते असू शकतात.

अनोळखी कॉल्स फिल्टर करा

ज्यांच्या फोनमध्ये Android चा नवा व्हर्जन आहे, त्यांच्यासाठी ‘Caller ID & Spam’ ही सोय उपयुक्त ठरते.

  • Phone अ‍ॅप उघडा

  • उजव्या वरच्या कोपर्‍यात तीन बिंदू असलेलं मेनू आयकॉन टॅप करा > Settings

  • "Caller ID & Spam" निवडा

  • "Filter spam calls" आणि "See caller & spam ID" हे दोन्ही ऑन करा

या सेटिंग्समुळे अनोळखी आणि संभाव्य स्पॅम कॉल्स आपोआप ब्लॉक होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : बनावट आयपीएसने आधीही केलेत कांड, परराज्यात नावावर गुन्हा; पत्नी आहे पोलीस अधिकारी

Sharad Pawar & Ajit Pawar : जे कोल्हापुरात होतं ते राज्यात होतं, स्थानिक स्वराज्य संस्थेत शरद पवार; अजित पवार एकत्र निवडणूक लढवणार

Leopard Attacks: शिरूरमध्ये संतापाचा स्फोट! बिबट्यांच्या हल्ल्यांवर निष्क्रिय प्रशासनाविरोधात तहसीलदार कार्यालयाला टाळे"

Latest Marathi News Live Update : माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आज दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेणार

Girish Mahaja : नाशिक-त्र्यंबक रस्ता पाडकाम वाद मिटला! गिरीश महाजनांच्या आश्वासनानंतर १३ दिवसांचे साखळी उपोषण स्थगित

SCROLL FOR NEXT