How to stop Spam Calls on Android esakal
विज्ञान-तंत्र

Spam Call Block Feature : स्पॅम कॉल्सना कायमचं ब्लॉक करणं झालं सोपं; मोबाईलमध्ये लपलेलं 'हे' फीचर एकदा वापरुन बघाच

Spam Call Blocking In Android Phone : स्पॅम कॉलपासून वाचण्यासाठी तुमच्या Android फोनवर तुम्ही हे कॉल ब्लॉक करू शकता.

Saisimran Ghashi

Spam Calls : मोबाईलवर येणारे स्पॅम कॉल हे सगळ्यांच्या त्रासाचे कारण आहे. एखाद्या महत्वाच्या कामात असताना किंवा विश्रांती घेत असताना हे कॉल येऊन त्रास देतात. त्यातल्या काही कॉल तर फसवणुकीच्यासुद्धा असू शकतात. पण या स्पॅम कॉलपासून वाचण्यासाठी काय करायचं? तुमच्या Android फोनवर तुम्ही या कॉल ब्लॉक करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कशी करायची आहे स्पॅम कॉल ब्लॉक.

याच्या काही सोप्या पद्धती आहेत.

DND सेवा सक्रिय करा (Do Not Disturb)

  • मोबाईलमध्ये असलेल्या SMS App मध्ये जा आणि "START" टाईप करून 1909 या नंबरवर पाठवा.

  • तुम्हाला बँकिंग, हॉस्पिटॅलिटीसारख्या विविध श्रेणींची लिस्ट मिळेल. प्रत्येक श्रेणीला वेगळा कोड असतो.

  • तुम्हाला कोणत्या प्रकारचे कॉल ब्लॉक करायचे आहेत त्या श्रेणीचा कोड पाठवा.

  • प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज येईल आणि 24 तासांच्या आत DND सेवा सुरु होईल.

  • ही सेवा थर्ड पार्टीच्या अनधिकृत व्यावसायिक कॉल ब्लॉक करण्यात प्रभावी आहे. पण बँका किंवा इतर महत्वाच्या सेवांच्या माहितीच्या मेसेजवर याचा परिणाम होणार नाही.

तुमच्या सिम कार्ड कंपनीच्या माध्यमातून DND सेवा सक्रिय करा

तुम्ही तुमच्या सिम कार्ड कंपनीच्या App द्वारेही DND सेवा सुरु करू शकता. (Jio, Airtel, Vi, BSNL यांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत)

तुम्ही ज्या नंबरवरून स्पॅम कॉल येतात ते नंबर ब्लॉक करू शकता.

Phone App मध्ये जा आणि Call History मध्ये जा.

स्पॅम नंबरवर काही सेकंद थांबा आणि "Block" किंवा "Report" निवडा.

ही पद्धत उपयुक्त आहे पण स्पॅम कॉलर्स वेगवेगळे नंबर वापरतात त्यामुळे मर्यादा आहेत.

अज्ञात किंवा संशयास्पद कॉल फिल्टर करा.

Android मध्ये असा पर्याय आहे ज्याद्वारे अज्ञात किंवा संशयास्पद स्पॅम कॉल स्वयंचलितपणे फिल्टर करता येतात.

Phone App मध्ये जा आणि Settings मध्ये जा.

"Caller ID & Spam" निवडा आणि "Filter spam calls" आणि "See caller & spam ID" हे पर्याय चालू करा.

हे फीचर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसलेल्या नंबरवरून येणारे कॉल ब्लॉक करण्यास मदत करते.

या सोप्या पद्धतींचा वापर करून तुम्ही स्पॅम कॉलचा त्रास कमी करू शकता आणि तुमचा वेळ वाचवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain News: पोलिसांच्या धाडसी कृतीचे कौतुक! शाळेची बस पाण्यात अडकली अन्...; विद्यार्थ्यांच्या थरारक सुटकेचा व्हिडिओ व्हायरल

Santosh Deshmukh Case: ''उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती, यांना पदावर ठेऊ नका'', धनंजय देशमुखांची अजित पवारांना विनवणी

Indian Ports Bill: समुद्री व्यापाराला बूस्ट! भारताचं ‘मेगा पोर्ट’ महाराष्ट्रात उभं राहणार, तब्बल 'इतक्या' कोटींचा प्रकल्प

Network Services Down: कॉल नाही, इंटरनेट गायब...; Airtel, Jio, Vi सेवा ठप्प, मोबाईल नेटवर्क डाऊन!

Latest Marathi News Live Updates: १४ गावातील रेल्वेचा बोगद्यात साचले पाणी

SCROLL FOR NEXT