E-Bike Battery
E-Bike Battery esakal
विज्ञान-तंत्र

E-Bike Battery : 'अशी' काळजी घेतली तरच ई-बाईक बॅटरी टिकेल, अन्यथा..; काय आहेत नेमके गैरसमज?

शैलेश पेटकर

बॅटरी, तिच्याविषयीचे समज गैरसमज, तिची देखभाल कशी करावी, बॅटरीचे (Battery) आयुष्य कसे वाढवावे, असे विविध प्रश्‍न प्रत्येकाच्या मनात आहेत.

सांगली : पेट्रोलचे दर (Petrol Price) गगनाला भिडले आहेत. दुसऱ्या बाजूला पर्यावरण संवर्धनासाठी ‘ई-बाईक्स’चा वापर गेल्या काही वर्षांत वाढला आहे. गतवर्षी शेकडो ई-बाईक (E-bike) सांगलीकरांनी खरेदी केल्या. मात्र, त्यातील बॅटरी, तिच्याविषयीचे समज गैरसमज, तिची देखभाल कशी करावी, बॅटरीचे (Battery) आयुष्य कसे वाढवावे, असे विविध प्रश्‍न प्रत्येकाच्या मनात आहेत.

याबाबत मिरज औद्योगिक वसाहतीतील (Miraj Industrial Estate) योगटेक कंपनीचे (Yogtech Company) संचालक चिन्मय गोरे यांनी सांगितलेली माहिती अशी की, श्री. गोरे वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी. बी. टेक. नंतर त्यांनी एमबीए केले. त्यानंतर त्यांनी प्राधान्याने बॅटरीविषयी अभ्यास सुरू केला. त्यातच करिअर करण्याचा निर्णय घेतला. २०१८ मध्ये त्यांनी मिरज औद्योगिक वसाहतीत योगटेक नावाची कंपनी सुरू केली. बॅटरी बनवणारी पश्‍चिम महाराष्ट्रातील ही एकमेव कंपनी आहे.

दुचाकीसाठी लागणाऱ्या बॅटरींविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘इलेक्ट्रिक दुचाकीत आता शासनाच्या नियमानुसार लिथियम-आयनच्या बॅटरी वापरल्या जातात. त्या कमी जागा व्यापणाऱ्या व वजनाने हलक्या असतात. त्यामुळे त्यांचा वापर केला जातो. शासनाने ‘एआयएस-१५६’ निकष ठरवून दिले आहेत. त्यानुसार ही बॅटरी बनवली जाते.

त्याचे साधारणतः सात ते आठ वर्षे आयुष्य असते. वेळच्या वेळी देखभाल केली तर बॅटरीचे आयुष्य वाढण्यास मदत होते. साधारणतः ३० ते ८० हजारांपर्यंत या बॅटरीच्या किमती आहेत. बॅटरीत आता तापमान संतुलनासह व्यवस्थापन तंत्रज्ञानही विकसित झाले आहे. त्यामुळे पूर्वी थर्मल रन बॅटरीचे स्फोट व्हायचे, मात्र आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यामुळे ९९ टक्के बॅटरीचा स्फोट होत नाही.’’

कशी दक्षता घ्याल...?

  • निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक वापर करू नका

  • चार्जिंग नेहमी केले पाहिजे

  • बॅटरी डिस्चार्ज होता कामा नये

  • वेळच्या वेळी देखभाल-दुरुस्ती झाली पाहिजे

  • बॅटरी मेंटनन्स सिस्टिमचा योग्य वापर झाला पाहिजे

लिथियम आयन...

लिथियम हा सर्वांत हलका धातू आणि सर्वांत कमी दाट असलेला घन घटक आहे आणि २० व्या शतकाच्या उत्तरार्धात, लिथियम बॅटरीमध्ये एनोड सामग्री म्हणून महत्त्वपूर्ण बनले. घटकाची उच्च इलेक्ट्रो-केमिकल क्षमता त्याला उच्च ऊर्जा-घनतेच्या रिचार्जेबल लिथियम-आयन बॅटरीचा एक मौल्यवान घटक बनवते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT