इंस्टाग्रामच्या पोस्ट एकावेळेस डिलीट करायच्या सोप्या स्टेप्स. esakal
विज्ञान-तंत्र

Instagram Post Delete : इंस्टाग्रामच्या पोस्ट एकावेळेस एका क्लिकमध्ये डिलीट करायच्या आहेत? फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स

Instagram Post : सोप्या स्टेप्स फॉलो करून एका क्लीकमध्ये डिलीट करा सगळ्या पोस्ट!

सकाळ डिजिटल टीम

Instagram : आजच्या डिजिटल युगात, सोशल मीडियावर सक्रिय राहणे आवश्यक आहे, विशेषत: इंस्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर. सतत येणाऱ्या नवीन फीचर्स आणि अपडेट्समुळे कधीकधी तुमच्या पोस्ट्स सांभाळणे कठीण वाटू शकते. पण आता इंस्टाग्रामने एकाच वेळी अनेक पोस्ट डिलीट करण्याची किंवा आर्काइव्ह करण्याची सुविधा दिली आहे. (How to delete Instagram post )

अनेक पोस्ट एकाच वेळी डिलीट किंवा आर्काइव्ह करणे हे तुमच्यासाठी फायदेशीर आहे. तुम्ही कंटेंट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर असो वा सामान्य वापरकर्ता, ही सुविधा तुमच्या प्रोफाइलमधून जुने पोस्ट काढून टाकण्यासाठी, तुमचे फीड अधिक प्रभावीपणे व्यवस्थित करण्यासाठी उपयुक्त आहे.

अनेक इंस्टाग्राम पोस्ट एकाच वेळी डिलीट किंवा आर्काइव्ह कसे करायचे?

(How to delete and archive Instagram post once)

  1. तुमच्या फोनमध्ये असलेले इंस्टाग्राम अॅप उघडा.

  2. स्क्रीनच्या खालच्या उजव्या कोपऱ्यातील आइकॉनवर टॅप करून तुमच्या प्रोफाइलवर जा.

  3. मेन्यू उघडण्यासाठी वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन रेषा (☰) वर टॅप करा.

  4. मेनूमधून "तुमचे क्रियाकलाप" (Your Activity) निवडा.

  5. "फोटो आणि व्हिडिओज" (Photos and videos) हा दुसरा पर्याय निवडा.

6. तुमच्या सर्व पोस्ट पाहण्यासाठी "पोस्ट्स" (Posts) वर टॅप करा.

7. विशिष्ट पोस्ट शोधण्यासाठी "क्रम आणि फिल्टर करा" (Sort & filter) पर्याय वापरा.

8. वरच्या उजव्या कोपऱ्यातील "निवडा" (Select) वर क्लिक करा.

9. तुम्ही डिलीट करायच्या किंवा आर्काइव्ह करायच्या पोस्ट निवडा.

10. निवडल्यानंतर, तुमच्या गरजेनुसार आर्काइव्ह किंवा डिलीट करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates: भारत पाक क्रिकेट सामन्याला विरोध शिवसेना महिला आघाडीच्या वतीने निदर्शने

Leopard Terror: 'आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागात बिबट्याचा सलग तीन दिवसांचा वावर': परिसरात भीतीचे वातावरण

Solapur Rain update: 'साेलापूर शहरातील रस्त्यावरुन वाहू लागल्या नद्या'; शनिवारी शहरात ३२.६ मिमी पाऊस; तीन दिवसांपासून ड्रेनेज तुंबलेलेच

Northeast India Earthquake: ईशान्य भारत भूकंपाने हादरला, बंगालपासून भूतानपर्यंतही जाणवले धक्के

IND vs AUS, ODI: स्मृती मानधनासह दोघींची अर्धशतकं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतिहासात पहिल्यांदाच घडला 'असा' पराक्रम

SCROLL FOR NEXT