Deepfake precaution eSakal
विज्ञान-तंत्र

Deepfake Video : 'डीपफेक'च्या धोक्यापासून असा करा स्वतःचा बचाव; कामी येतील 'या' टिप्स!

Deepfake precaution : गेल्या दोन दिवसांमध्ये रश्मिका मंदाना, कॅटरीना कैफ अशा अभिनेत्रींचे डीपफेक व्हिडिओ आणि मॉर्फ्ड फोटो व्हायरल झाले आहेत.

Sudesh

इंटरनेटवर दररोज कित्येक गोष्टी अपलोड होत असतात. यातील खऱ्या गोष्टी आणि खोट्या गोष्टी ओळखणं हे दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये रश्मिका मंदाना, कॅटरीना कैफ अशा अभिनेत्रींचे डीपफेक व्हिडिओ आणि मॉर्फ्ड फोटो व्हायरल झाले आहेत.

एखाद्या व्यक्तीचा खोटा व्हिडिओ तयार करण्यासाठी 'डीपफेक' तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. 'Deep Learning' आणि 'Fake' अशा दोन शब्दांपासून DeepFake हा शब्द तयार झाला आहे. ही टेक्नॉलॉजी खोटे व्हिडिओ तयार करण्यासाठी Generative Adversarial Networks (GANs) याचा वापर करते. याचा वापर काही जण केवळ मनोरंजनासाठी करतात, मात्र याचा वापर चुकीच्या कामांसाठीच जास्त होत असल्याचं दिसून येत आहे.

असे ओळखा डीपफेक व्हिडिओ

डीपफेक तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन कोणाच्याही तोंडी कोणतंही वाक्य टाकणं शक्य झालं आहे. एखाद्या व्हिडिओमध्ये बोलणारी व्यक्ती खरोखरच ती आहे की नाही याचा अंदाज लावणंही जवळपास अशक्य झालं आहे. मात्र, काही गोष्टींवर लक्ष देऊन तुम्ही डीपफेक व्हिडिओ ओळखू शकता. (Tech News)

  • व्हिडिओमधील व्यक्तीच्या चेहऱ्याकडे लक्ष द्या. या व्यक्तीचे डोळे, तोंडाची हालचाल यामध्ये काही विचित्रपणा जाणवेल.

  • बहुतांश डीपफेक व्हिडिओमध्ये बोलणाऱ्या व्यक्तीच्या पापण्या झडपण्याचं प्रमाण अगदी कमी असतं. याकडे तुम्ही लक्ष देऊ शकता.

  • बऱ्याच वेळा डीपफेक व्हिडिओमध्ये बोलणारी व्यक्ती आणि बॅकग्राउंड यातील कलर शेडचा फरक आरामात दिसून येतो.

  • कित्येक डीपफेक व्हिडिओ तयार करणारे अ‍ॅप्स फ्री नाहीत. त्यामुळे एक्स्पोर्ट होणाऱ्या व्हिडिओवर अ‍ॅपचा लोगो दिसतो.

  • डीपफेक व्हिडिओ ओळखण्यासाठी AI or Not, Hive Moderation किंवा Deepware Scanner अशा एआय टूल्सचा वापर केला जाऊ शकता.

'डीपफेक'पासून असा करा बचाव

डीपफेक व्हिडिओंचा शिकार होण्यापासून बचाव करायचा असेल, तर काही गोष्टींची खबरदारी घेण्याची गरज आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं सोशल मीडिया अकाउंट प्रायव्हेट करा. यामुळे अनोळखी व्यक्तींना तुमच्या फोटोंचा अ‍ॅक्सेस मिळत नाही.

सोशल मीडियावर पर्सनल फोटो किंवा व्हिडिओ शेअर करणं टाळा. सोबतच अनोळखी व्यक्तींसोबत आपले फोटो शेअर करणं टाळा.

आपला आक्षेपार्ह वा एडिटेड फोटो कुठे दिसल्यास, त्वरीत त्या प्लॅटफॉर्मकडे याबाबत तक्रार करा. 36 तासांच्या आत तुमचा फोटो इंटरनेटवरून डिलीट करणं या प्लॅटफॉर्मला बंधनकारक असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Pass : एकाच महिन्यात 5 लाख विद्यार्थ्यांना शाळेत मिळाले एसटी पास; कोणाला मिळतो सवलतीचा पास? वाचा...

Indian Women Cricket Team: भारतीय महिला संघ आज रचणार इतिहास; T20 मालिका जिंकण्याची संधी

"निलेश तू कसा आहेस माहितीये..." साबळेंच्या व्हायरल व्हिडिओनंतर मराठी अभिनेता झाला व्यक्त ; म्हणाला..

Sonipat Highway Accident : ढाब्यावर जेवण करून परतताना कार-ट्रकचा भीषण अपघात; तीन मित्रांचा दुर्दैवी अंत, एकाची प्रकृती गंभीर

Pune Railway Station: "थोरले बाजीराव पेशवे पुणे स्टेशन… "; रेल्वे स्थानकावर झळकले बॅनर, राज्यात नवा वाद पेटला!

SCROLL FOR NEXT