Blue Tick Sakal
विज्ञान-तंत्र

नेटकऱ्यांनो! 'अशी' मिळवा 'ब्लू टिक', अकाउंट करा व्हेरीफाइड

केतन पळसकर

नागपूर : समाजातील प्रत्येक नागरिकाला आज सोशल मीडियाचे वेड आहे. तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येक जण सोशल मीडियावर दररोज सर्फिंग करतात. याचे फायदे जितके आहेत तितकेच तोटेही आहेत. या माध्यमांचा उदय झाल्यापासून गुन्ह्याचे दररोज नव-नवे प्रकार पुढे येत आहेत. यावर वचक बसवायचा झाल्यास प्रत्येक अकाउंटला ‘व्हेरीफाइड’ (blue tick on social media) सक्तीचे करायला हवे. (how to get blue tick on social media)

अकाउंट ओपन करताना फोटो आयडी बंधनकारक नसल्याने सायबर चोरटे फोफावले आहेत. अशा चोरट्यांचा युजरला फटका बसतो. अकाउंटला ओळखपत्राच्या आधारे व्हेरीफाइड करण्याची सोय असून देखील या बड्या कंपन्यांनी अनेक जाचक अटी यासाठी ठेवल्या आहेत. सोशल मीडिया कंपन्यांनी सरकार, कंपनी, ब्रँड्स आणि संघटना, वृत्तपत्र कार्यालय आणि पत्रकार, मनोरंजन, क्रीडा आणि क्रीडा उपक्रम, आयोजक आणि प्रभावशाली व्यक्तीच्या व्यक्तीसाठी ब्लू टिक कॅटेगरी बनवली आहे.

ब्लू टिक मिळवण्यासाठी व्यक्ती किंवा संघटना या कॅटेगरीत अटींमध्ये असणे गरजेचे आहे. तसेच, सातत्याने ते अॅक्टिव्ह सुद्धा असायला हवे. अनेक दिवसांपासून अॅक्टिव्ह नसल्यास ब्लू टिक हटविली जाते. या जाचक अटींमुळे फेक अकाउंट काढत आपला हेतू साध्य करणे अशा चोरट्यांसाठी डाव्या हाताचा खेळ आहे. अकाउंट व्हेरीफाइड करणे बंधनकारक केल्यास यूजर देखील बिनधास्त सर्फिंग करू शकतील व फेक अकाउंटसुद्धा बाद होतील. अकाउंटला खात्रीलायक असल्याचा दर्जा मिळाल्याने इतर यूजर देखील विश्‍वासाने अकाउंट फॉलो करू शकतील.

अशी मिळवा ‘ब्लू टिक’ -

  • सोशल मीडिया अकाउंटच्या सेटिंगमध्ये जा

  • रिक्वेस्ट वेरीफीकेशन बटनवर क्लिक करा

  • कॅटेगरी निवडा

  • ओळख म्हणून सरकार मान्य ओळखपत्र, कार्यालयाकडून दिलेला ई-मेल ॲड्रेस किंवा अधिकृत वेबसाइटची लिंक द्या.

  • अटीमध्ये बसत असल्यास तुमचे अकाउंट व्हेरीफाइड होईल.

व्हेरीफाइड अकाउंट असल्यास फॉलो करणाऱ्याला ते सोपे जाते. काही जण व्यवसायाच्या निमित्ताने अनेक अकाउंट ओपन करतात. यावर शासनाने मर्यादा आणायला हवी. ई-मेलची ओळख देत अकाउंट उडण्यापेक्षा मोबाईल नंबरनुसार अंकाऊंटला ओळख दिल्यास समाजातील अशा वाईट प्रवृत्तीचे लोक शोधण्यास मदत होईल.
-प्रा. डॉ. राजेश तिमाने, माहिती व तंत्रज्ञान तज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

भेटीसाठी आता अपॉइंटमेंट घ्यावी लागते, स्वतःची ओळख सांगावी लागते... अजित पवारांच्या आठवणीत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची खंत

Pune Bengaluru Highway : कराड उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात! कोल्हापूर-पुणे मार्गावर उद्यापासून वाहनांची चाचणी; कधी होणार पूर्ण खुला?

Ketan Agarwal Killed Case : गुगलवर शोधले खून करण्याचे पर्याय;गडावरून ढकलण्याचा केला होता सराव

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

SCROLL FOR NEXT