whatsapp setting change esakal
विज्ञान-तंत्र

Whatsapp Security Tips : व्हॉट्सॲप कॉल वरून काढता येतं तुमचं लोकेशन; पटकन बदला ही सेटिंग, नाहीतर होईल पश्चाताप

WhatsApp location tracking setting : व्हॉट्सॲपवर कॉल करत असाल तर सावध व्हा कारण त्यावरून तुमचे लोकेशन ट्रॅक केला जाऊ शकते. याची सेटिंग कशी बदलून घ्यायची हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Saisimran Ghashi

WhatsApp call privacy setting : व्हॉट्सॲपवर कॉल करत असाल तर सावध व्हा कारण त्यावरून तुमचे लोकेशन ट्रॅक केला जाऊ शकते. तुमच्या फोनवरील लोकेशन बंद असले तरीही, एका साध्या सेटिंगच्या मदतीने हॅकर्सना तुमचा लोकेशन मिळवता येतो. व्हॉट्सॲप हा जगभरात सर्वाधिक वापरला जाणारा मेसेजिंग ॲप असून, भारतात याचे ५५० दशलक्षांहून अधिक वापरकर्ते आहेत. चॅट, ऑडिओ व व्हिडिओ कॉलसाठी वापरले जाणारे हे अॅप सुरक्षित असल्याचा दावा करते. मात्र, सायबर घोटाळ्यांबाबत सतत तक्रारी येत आहेत.

तुमचा लोकेशन सुरक्षित ठेवण्यासाठी या सेटिंग्स सक्रिय करा

व्हॉट्सॲप कॉल्सच्या वेळी तुमचा लोकेशन ट्रॅक केला जाऊ शकतो, ही एक महत्त्वाची समस्या आहे. यावर तोडगा म्हणून व्हॉट्सअॅपने "Protect IP Address in Calls" नावाचे फीचर उपलब्ध करून दिले आहे. हे फीचर सुरू केल्याने कॉल दरम्यान तुमचा आयपी अड्रेस लपवला जातो आणि लोकेशन सुरक्षित राहते.

हे फीचर कसे सुरू कराल?

1. व्हॉट्सॲप उघडा.

2. वरती उजव्या कोपऱ्यातील तीन डॉट्सवर टॅप करा.

3. “Settings” पर्याय निवडा आणि “Privacy” सेक्शनमध्ये जा.

4. “Advanced” या पर्यायावर क्लिक करा.

5. “Protect IP Address in Calls” हे फीचर ऑन करा.

ही प्रक्रिया पूर्ण केल्यावर तुमचा आयपी अड्रेस सुरक्षित होईल आणि तुमचा लोकेशन ट्रॅक करणे कठीण होईल.

याशिवाय, व्हॉट्सॲप एक नवीन फीचर आणत आहे, ज्यामुळे चॅनेल्स जॉइन करणे खूप सोपे होईल. सध्या चॅनेल शोधण्यासाठी लिस्टमध्ये शोधावे लागते. मात्र, या नव्या फीचरमुळे प्रत्येक चॅनेलला एक QR कोड मिळेल. हा कोड स्कॅन करून युजर्स एका क्लिकवर चॅनेल जॉइन करू शकतील.

ही सुविधा लवकरच अँड्रॉइड आणि आयओएस वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे. या फीचरमुळे चॅनेल्सचा वापर अधिक सुलभ होईल आणि चॅनेल ग्रोथ वाढेल, असा व्हॉट्सअॅपचा दावा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Samman Nidhi : प्रतिक्षा संपली ! देशातील १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 'या' दिवशी जमा होणार २००० रुपये

Palghar : भाजपने पालघर साधू हत्याकांडाचे आरोप ज्यांच्यावर केले त्याच नेत्याला घेतलं पक्षात, प्रवेशाचा मोठा कार्यक्रम

Amravati:'पोटातल्या बाळासह गर्भवतीचा आणि इतर २ बालकांचा मृत्यू'; उपजिल्हा रुग्णालयातली धक्कादायक घटना..

Latest Marathi Breaking News : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर उद्धव ठाकरे दाखल

Kolhapur Weather: कोल्हापुरात मध्यरात्री तापमान १४ अंश सेल्सिअसवर! दाट धुक्यात हरवले शहर, नागरिकांनी पेटवल्या शेकोट्या

SCROLL FOR NEXT