Tech Tips eSakal
विज्ञान-तंत्र

Tech Tips : स्ट्राँग पासवर्ड कसा बनवावा? पेटीएमच्या संस्थापकाने सांगितल्या सोप्या टिप्स; जाणून घ्या

Password Tips : तंत्रज्ञान वेगाने अपडेट होत असल्यामुळे, आपल्या सुरक्षेसाठी आपल्यालाही अपडेट होणं गरजेचं आहे.

Sudesh

आजकाल सायबर गुन्हेगारीचं प्रमाण भरपूर वाढलं आहे. एआयच्या मदतीने अगदी तुमच्या कीबोर्डचा आवाज ऐकून देखील तुमचा पासवर्ड चोरी करता येऊ शकतो. तंत्रज्ञान वेगाने अपडेट होत असल्यामुळे, आपल्या सुरक्षेसाठी आपल्यालाही अपडेट होणं गरजेचं आहे.

पेटीएम कंपनीचे संस्थापक सीईओ विजय शेखर शर्मा यांनी चांगला आणि मजबूत पासवर्ड कसा तयार करावा याबाबत माहिती दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी पासवर्डच्या लांबीवर अधिक भर दिला. पासवर्ड जेवढा मोठा, आणि विविधता असलेला असेल तेवढा तो अधिक सुरक्षित असतो; असं ते म्हणाले.

हॅकर्स देखील क्रॅक करु शकणार नाहीत असा पासवर्ड तयार करण्यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतील. या टिप्स विजय शेखर यांनी दिल्या आहेत. यामध्ये पहिली टिप त्यांनी दिली आहे ती म्हणजे - आपला पासवर्ड अगदी टिपिकल बनवा. यामध्ये स्मॉल आणि अपरकेस लेटर्स, अंक आणि चिन्हांचा वापर करा. जेवढा मोठा आणि अवघड पासवर्ड तुम्ही बनवाल, तेवढा तो हॅक केला जाण्याची शक्यता कमी होते, असं ते म्हणाले.

कॉमन पासवर्ड टाळा

कित्येक लोक अगदीच साधा पासवर्ड ठेवतात. आपल्या पेटचं नाव, गावाचं नाव, गर्लफ्रेंड किंवा एक्सचं नाव असे पासवर्ड ठेवलेले असतात. अशा पासवर्डमुळे तुमच्याबद्दल थोडीफार माहिती असलेली व्यक्ती देखील तुमचं अकाउंट हॅक करू शकते.

सामान्य पॅटर्न टाळा

कित्येक लोक अगदी साध्या पॅटर्नचे पासवर्ड ठेवतात. मोबाईल नंबरचे सुरुवातीचे किंवा शेवटचे आकडे, Password हाच शब्द, 12345, किंवा आपलं नाव आणि पुढे @123 असे पासवर्ड अगदीच सामान्य आहेत. यांचा वापर करणं टाळावं.

खबरदारी

आपली सिस्टीम हॅक होऊ नये यासाठी विजय यांनी काही टिप्स देखील दिल्या आहेत. यासाठी शक्य तेव्हा टू स्टेप ऑथेंटिकेशन ही सुविधा वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. यामुळे पासवर्ड माहिती असलेली व्यक्ती देखील तुमच्या परवानगीशिवाय लॉगइन करू शकत नाही.

तसंच आपला पासवर्ड काही महिन्यांनी बदलत राहिला पाहिजे असंही विजय यांनी सांगितलं. एकाहून अधिक अकाउंट्ससाठी एकच पासवर्ड वापरणं टाळावं असंही त्यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli News: ‘तुतारी’ गायब! पडळकरांचा जोरदार हल्लाबोल; भाजपची रॅली ठरली शक्तीप्रदर्शनाचा मोठा महोत्सव

'यदा- कदाचित'वर झालेली बंदी घालण्याची मागणी पण आनंद दिघे नाटक पाहायला आले आणि... नेमकं काय घडलेलं?

Mahayuti Cabinet Meeting: सिडको आणि म्हाडाच्या प्रकल्पांसाठी नवीन धोरण तयार करणार अन्...; महायुती मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Post-COVID Diabetes Surge: कोरोनानंतर आरोग्याचे नवे संकट; बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांत वाढ

Latest Marathi Breaking News: परंडा येथे दोन गटात दगडफेक, आमने सामने आल्याने नगरपालिकेमध्ये गोंधळ

SCROLL FOR NEXT