AC Explosion Safety Tips esakal
विज्ञान-तंत्र

AC Explosion Safety Tips : एसी वापरताना एक चूक अन् होऊ शकतो मोठा ब्लास्ट; आत्ताच पाहा कशी खबरदारी घ्यावी?

AC Explosion Safety Tips : उन्हाळ्यात एसीचा योग्य वापर न केल्यास स्फोटाचा धोका निर्माण होतो या 6 सोप्या पण महत्त्वाच्या टिप्स जाणून काळजी घेतल्यास अपघात टाळता येतो

Saisimran Ghashi

AC Safety Tips : मे आणि जून महिन्यांमध्ये तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा आकडा पार केला आहे. अंगाची लाहीलाही करणाऱ्या या उन्हापासून बचाव करण्यासाठी बहुतांश घरांमध्ये, ऑफिसमध्ये आणि दुकांनांमध्ये एअर कंडिशनर (AC) सतत चालू ठेवला जातो. मात्र एसी जरी उष्णतेपासून मुक्तता देत असला तरी त्याचा चुकीचा वापर धोकादायक ठरू शकतो. सध्या अनेक ठिकाणी एसी स्फोट होण्याच्या घटना वाढल्या आहेत आणि त्यामागील मुख्य कारण म्हणजे अयोग्य देखभाल आणि वापर.

या उन्हाळ्यात एसी सुरक्षितपणे वापरणे खूप महत्त्वाचे आहे. आपणही दिवसभर एसी चालू ठेवत असाल तर खालील ६ सेफ्टी टिप्स लक्षात ठेवा

नियमित सर्व्हिसिंग

जर एसीने सुमारे ६०० तास काम केले असेल, तर त्याची तात्काळ सर्व्हिसिंग करा. वेळेवर सर्व्हिसिंग न केल्यास मशीनवर ताण येतो आणि त्यामुळे स्फोटाचा धोका वाढतो.

सतत चालू ठेवू नका

अनेकजण एसी सलग १५-१६ तास चालू ठेवतात. ही सवय अत्यंत धोकादायक आहे. सलग वापरामुळे यंत्रणेवर ताण येतो आणि स्फोटाची शक्यता वाढते. दर ४-५ तासांनी एसी बंद करून एक-दोन तास विश्रांती द्या.

फिल्टर नियमितपणे स्वच्छ करा

एसीचा फिल्टर हवा खेळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. जर तो घाणेरडा असेल, तर कंप्रेसरवर अधिक ताण येतो. त्यामुळे दर ४-५ आठवड्यांनी फिल्टर नीट स्वच्छ करणे आवश्यक आहे.

गॅस गळतीची तपासणी करा

एसीमधील गॅस गळती ही स्फोटाची मोठी कारणे असते. विशेषतः ही गळती उष्ण कंप्रेसरशी संपर्कात आली, तर ती धोकादायक ठरू शकते. त्यामुळे वारंवार गॅस गळती आहे का याची तपासणी करत राहा.

स्टॅबिलायझर वापरा

वीज पुरवठ्यामध्ये सतत चढ-उतार होत असेल तर चांगल्या दर्जाचा स्टॅबिलायझर वापरणे आवश्यक आहे. यामुळे मशीनचे संरक्षण होते आणि त्याचे आयुष्यही वाढते.

२४ अंश सेल्सिअस तापमान योग्य

एसी १६ किंवा १८ अंशांवर ठेवणे टाळा. यामुळे वीजबिल वाढते आणि यंत्रणेलाही जास्त लोड येतो. त्यामुळे २४ अंश सेल्सिअस हे तापमान कायम ठेवा जे उष्णतेपासून सुटका देत असूनही सुरक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

SCROLL FOR NEXT