WhatsApp Meta AI eSakal
विज्ञान-तंत्र

Meta AI : व्हॉट्सअ‍ॅपवर कसं वापरायचं 'मेटा एआय'? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

ओपन एआय कंपनीने आपला चॅटजीपीटी हा चॅटबॉट लाँच केल्यानंतर काही महिन्यांमध्येच इतर कंपन्यांनी देखील या स्पर्धेत उडी घेतली आहे.

Sudesh

WhatsApp Meta AI : व्हॉट्सअ‍ॅपची पॅरंट कंपनी असणाऱ्या मेटाने काही दिवसांपूर्वीच आपल्या सर्व प्रोडक्टमध्ये एआय फीचर्स उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे आता फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपवर एआय चॅटबॉट उपलब्ध झाला आहे. मात्र, या चॅटबॉटचा नेमका फायदा काय आणि याचा वापर कसा करायचा याबाबत अनेकांना माहिती नाही.

ओपन एआय कंपनीने आपला चॅटजीपीटी हा चॅटबॉट लाँच केल्यानंतर काही महिन्यांमध्येच इतर कंपन्यांनी देखील या स्पर्धेत उडी घेतली आहे. कित्येक चॅटबॉट्स हे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देऊ शकतात. मेटाचा एआय चॅटबॉट देखील अशाच प्रकारे काम करेल. जोपर्यंत तुम्ही त्याला एखादा प्रश्न विचारणार नाही, तोपर्यंत तो इनअ‍ॅक्टिव्ह राहणार आहे.

कसं वापराल Meta AI

  • मेटा एआय वापरण्यासाठी आपल्या चॅट लिस्टमध्ये सगळ्यात वरती असणाऱ्या 'सर्च बॉक्स'वर टॅप करा.

  • यानंतर सजेस्टेड प्रॉम्प्टवर क्लिक करू शकता, किंवा स्वतः नवीन प्रॉम्प्ट टाईप करू शकता.

  • यानंतर एंटर दाबताच तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळेल.

  • यासाठी तुम्हाला सुरुवातीला एआय सुविधा वापरण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपला परवानगी द्यावी लागेल.

मेटा एआय ही सुविधा टप्प्या-टप्प्याने सर्व यूजर्सना देण्यात येत आहे. तुमच्या अ‍ॅपमध्ये अद्याप हे फीचर आलं नसेल, तर अ‍ॅप अपडेट करून पहा. त्यानंतरही तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपमध्ये Meta AI फीचर मिळालं नाही; तर तुम्हाला काही वेळ वाट पहावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

M Phil Professors : १४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा! एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट/सेटमधून सूट

Latest Maharashtra News Live Updates: मराठीत बोललो तर माध्यम माझी भावना सर्व महाराष्ट्रातील लोकांना लाईव्ह दाखवतील - फडणवीस

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Pune News : तीन वर्षात टाकली केवळ ९ किलोमीटरचीच सांडपाणी वाहिनी; प्रशासनाने टोचले ठेकेदाराचे कान

Monsoon Session: तुकडेबंदी कायदा रद्द! पुढे कशी असेल कार्यप्रणाली? 'त्या' जमिनींना नियमातून वगळले

SCROLL FOR NEXT