UPI AutoPay to recharge Jio Number sakal
विज्ञान-तंत्र

Jio युजर्ससाठी UPI ऑटोपे फीचर; आपोआप होईल रीचार्ज, असे करा सेट

सकाळ डिजिटल टीम

UPI AutoPay to recharge Jio Number : रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड वापरकर्त्यांसाठी यूपीआय ऑटोपे (UPI Autopay) हे नवीन फीचर आणले आहे. यामुळे jio वापरकर्त्यांचे काम सोपे होणार आहे. रिलायन्स जिओ UPI ऑटोपे फीचर (Jio UPI Autopay Feature) रिलायन्स आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCAI) यांच्यातील भागीदारीतून देण्यात आले आहे. हे नवीन फीचर वापरकर्त्याला त्यांच्या रिलायन्स जिओ नंबरवर प्रीपेड प्लॅन्स मॅन्युअली रीचार्ज करण्याच्या त्रासातून सुटका करेल आणि ऑटोमॅटिक रिचार्ज करेल.

Jio UPI ऑटोपे फीचर तुम्हाला प्लॅन तयार करता येईल, त्यामध्ये बदल करता येतील आणि तो डिलीट देखील करता येईल. UPI पिन न टाकता देखील 5,000 रुपयांपर्यंत पेमेंट केले जातील सध्या हे ऑटोपे फीचर प्रीपेड यूजर्सपुरतेच मर्यादित असेल, पोस्टपेड यूजर्स या फीचरचा लाभ घेऊ शकणार नाहीत.

हे फीचर कसे वापराल

रिलायन्स जिओने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPACI) सोबत युती करून प्रीपेड प्लॅन वापरकर्त्यांना त्यांच्या रिलायन्स जिओ प्रीपेड प्लॅनचे ऑटोमॅटिक रिचार्ज UPI ट्रांझिक्शनद्वारे करता येणार आहेत. UPI ऑटोपे सुविधा फक्त प्रीपेड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे आणि 5,000 रुपयापर्यंतच्या रिचार्जसाठी, तुम्हाला UPI पिन टाकण्याची गरज नाही. मात्र 5,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या रिचार्जसाठी, तुम्हाला पिन टाकावा लागेल. Reliance Jio UPI ऑटोपे फीचर वापरुन ठराविक टॅरिफ प्लॅनसाठी ई-मेंडेट तयार करण्यास, तो प्लॅन बदलने आणि काढून टाकता येईल.

ऑटोपे (AutoPay) फीचर सुरु कसं करणार?

तुमच्या स्मार्टफोनवर MyJio मोबाईल अॅप उघडा

स्क्रीनच्या वरच्या बाजूला मोबाइल सेक्शनवर टॅप करा

सेटअप Jio ऑटोपे वर टॅप करा

त्यानंतर तुम्हाला एका नवीन पेजवर रिडायरेक्ट केले जाईल त्याच्या तळाशी असलेल्या Get Started बटणावर टॅप करा.

त्यानंतर तुम्हाला तुमच्या ऑटोमेटिक प्रीपेड सर्कलसाठी प्लॅन निवडा आणि त्यावर टॅप करा.

त्यानंतर तुम्ही पसंतीचा पेमेंट मोड, UPI किंवा बँक खाते यापैकी एक पर्याय निवडता येईल, तेव्हा UPI वर टॅप करा आणि पुढे जा.

नंतर तुम्ही UPI डिटेल्स द्या आणि ते व्हेरिफाय करा, यानंतर तुमच्या Jio नंबरवर हे फीचर सुरु केले जाईल.

एकदा ही प्रोसेस पूर्ण झाल्यावर, तुम्ही निवडलेल्या रिचार्ज प्लॅनसाठी ऑटोपे सेट होईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update: कोंढवे धावडे परिसरात मुसळधार पावसाने महापालिकेच्या व्यवस्थापनातील त्रुटी उघड

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

SCROLL FOR NEXT