fever FB shuts down eSakal
विज्ञान-तंत्र

Fever FM : रेडिओचा ट्रेंड झाला कमी, HT ग्रुपने घेतला 'फीवर एफएम' बंद करण्याचा निर्णय!

मीडिया इंडस्ट्रीमध्ये वाढलेल्या ट्रेंड्समुळे हे रेडिओ चॅनल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेडिओ जॉकी, जाहिरातदार, पार्टनर्स, कर्मचारी आणि सर्व श्रोत्यांचे रमेश यांनी आभार मानले.

Sudesh

Fever FM Shuts Down : एचटी मीडिया ग्रुपचं एफएम रेडिओ स्टेशन असणाऱ्या 'फीवर एफएम'ला बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीच्या ऑडिओ बिझनेस विभागाचे सीईओ रमेश मेनन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.

स्टेशन बंद करण्याचा निर्णय अगदी कठीण होता. मात्र, भरपूर विचार केल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला आहे. मीडिया इंडस्ट्रीमध्ये वाढलेल्या ट्रेंड्समुळे हे रेडिओ चॅनल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेडिओ जॉकी, जाहिरातदार, पार्टनर्स, कर्मचारी आणि सर्व श्रोत्यांचे रमेश यांनी आभार मानले.

याबाबत काही कर्मचाऱ्यांनी निराशा व्यक्त केली, तर काही कर्मचाऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. फीव्हर एफएमच्या मार्केटिंग विभागातील व्हाईस प्रेसिडेंट मोनालिसा मंडल यांनी याबाबत दुःख व्यक्त केलं. त्या चार वर्षांपासून याठिकाणी कार्यरत होत्या. त्यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांचे आभार देखील मानले.

रेडिओचा अंत लवकरच..

फीवर एफएमने आपल्या लिंक्डइन अकाउंटवरुन याबाबत माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये रमेश मेनन यांचा व्हिडिओही देण्यात आला आहे. या पोस्टमध्ये असं लिहिलं आहे, की रेडिओ हा तुमच्या सर्वांच्या प्रवासातील एक सोबती होता. मात्र, प्रत्येक प्रवास कधी ना कधी संपत असतो. रेडिओचा अंतही तुमच्या अपेक्षेपेक्षा लवकरच होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local : लोकलने स्टेशन चुकवलं, प्लॅटफॉर्म सोडून २ किमी पुढे थांबली; गाडीतल्या प्रवाशांना रुळावर उतरण्याची वेळ, चूक कुणाची?

MPSC Exam : सोलापूरचा विजय लामकाने प्रथम; महिला प्रवर्गातून आरती जाधव प्रथम

Chhatrapati Sambhajinagar: व्यापाऱ्याचे दोन किलो सोने लंपास; गुजरातच्या तिघांविरोधात गुन्हा, सव्वातीन कोटींची फसवणूक

Silver Trader Death : सांगलीतील 24 वर्षीय चांदी व्यावसायिकाचा कोल्हापुरात संशयास्पद मृत्यू; चांदीच्या पार्सलमध्ये आढळलं तांबं, घटनेने मोठी खळबळ

Supreme Court: न्यायाधीशाला ‘विकण्याचा’ प्रयत्न, ३० लाखांच्या लाच प्रकरणात ७० वर्षीय वकिलाला सुप्रीम कोर्टाचा जबरदस्त धक्का!

SCROLL FOR NEXT