Humane AI Pin eSakal
विज्ञान-तंत्र

Humane AI Pin : तुमच्या हाताची होणार स्क्रीन, खिशाला अडकवता येणार कम्प्युटर; पुढील वर्षीपासून मिळणार डिलिव्हरी

ह्यूमेन कंपनीने आपल्या अधिकृत एक्स हँडलवरुन डिलिव्हरीबाबत माहिती दिली आहे. एआय पिनची डिलिव्हरी 2024 साली मार्च महिन्यात सुरू करण्यात येणार आहे.

Sudesh

Humane AI Pin Delivery : ह्यूमेन कंपनीने काही दिवसांपूर्वीच आपला विअरेबल कम्प्युटर सादर केला होता. आता या कम्प्युटरच्या डिलिव्हरीची तारीख कंपनीने जाहीर केली आहे. पुढील वर्षीच्या मार्चपासून हे कम्प्युटर लोकांना मिळणार आहेत. विशेष म्हणजे, ह्यूमेन कंपनीमध्ये ओपन एआयचे सीईओ सॅम अल्टमन (Sam Altman) यांनीही गुंतवणूक केली आहे.

ह्यूमेन एआय पिन (Humane Wearable Computer) हे प्रॉडक्ट 10 नोव्हेंबर रोजी लाँच करण्यात आलं होतं. एआय टेक्नॉलॉजीचा (AI) वापर करुन तयार कऱण्यात आलेलं हे छोटंसं गॅजेट लोक आपल्या छातीवर बसवू शकतात. एखादा बॅज लावावा त्याप्रमाणे हा 'कम्प्युटर' आपल्या खिशावर लावता येतो.

या कम्प्युटरचं (Humane Ai Pin) वैशिष्ट म्हणजे, यामध्ये कोणतीही स्क्रीन नाहीये. मात्र, यामध्ये एक छोटासा प्रोजेक्टर दिला आहे, ज्यामुळे तुम्ही जी गोष्ट या पिनसमोर पकडाल, त्याचीच स्क्रीन होणार आहे. म्हणजेच, तुम्ही तुमचा तळहात या पिनसमोर पकडला, तर त्यावर तुम्हाला स्क्रीन दिसू शकते.

यामध्ये कित्येक सेन्सर्स, स्पीकर आणि मायक्रोफोन देण्यात आले आहेत. याचा बाहेरचा कॅमेरा हा गरज नसल्यास बंद राहतो, तसंच याचा मायक्रोफोनदेखील परवानगीशिवाय आवाज रेकॉर्ड करत नाही, असं कंपनीच्या सीईओंनी स्पष्ट केलं आहे.

ह्यूमेन कंपनीने आपल्या अधिकृत एक्स हँडलवरुन डिलिव्हरीबाबत माहिती दिली आहे. एआय पिनची डिलिव्हरी 2024 साली मार्च महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. ज्या ग्राहकांनी सगळ्यात आधी बुकिंग केली होती, त्यांना आधी डिलिव्हरी मिळेल. सध्या केवळ अमेरिकेत याची डिलिव्हरी मिळणार आहे, असं कंपनीने स्पष्ट केलं.

या पिनची किंमत 699 डॉलर्स एवढी आहे. यासोबतच ग्राहकांना कंपनीचं वार्षिक सबस्क्रिप्शन देखील घ्यावं लागेल. या सबस्क्रिप्शनची किंमत 24 डॉलर्स असेल. यामध्ये एक मोबाईल नंबर आणि डेटा पॅक देण्यात येईल. अमेरिकेतील टी-मोबाईल कंपनी ही मोबाईल सुविधा देणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : ठाकरे मेळाव्यावर मुनगंटीवारांची स्पष्टोक्ती

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT