Hyundai Kona  esakal
विज्ञान-तंत्र

Hyundai Kona : पेट्रोल अन् इलेक्ट्रिक दोन्ही व्हॅरिएंटमध्ये लाँच होणार ही कार, जाणून घ्या खासियत

या SUV कारमध्ये काय खास पाहायला मिळणार आहे, पुढे आम्ही याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत

सकाळ ऑनलाईन टीम

Hyundai Kona : दक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी Hyundai ने आपली SUV कार Kona चे अनावरण केले आहे. या वर्षाच्या अखेरीस ही कार पेट्रोल आणि इलेक्ट्रिक पॉवर ट्रेनसह सादर केली जाऊ शकते. आकर्षक डिझाईनसह, कार ADAS सारख्या सेफ्टी फिचरसह देखील फुलफील असू शकते. या SUV कारमध्ये काय खास पाहायला मिळणार आहे, पुढे आम्ही याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.

नवीन ह्युंदाई कोना डिझाइन

कारच्या लूकबद्दल बोलायचे झाल्यास, तिला एक लाँब बोनेट, पूर्ण-रुंदीचा 'सीमलेस होरायझन' एलईडी लाइट बार आहे ज्यामध्ये बंपरच्या बाजूने हेडलाइट्स आहेत. याच्या इलेक्ट्रिक मॉडेलबद्दल बोलल्यास समोर चार्जिंग पर्याय दिलेला आहे. याशिवाय रूफ रेल, ओआरव्हीएम, फ्लेर्ड व्हील आर्च, स्टायलिश सिल्व्हर व्हील्स देखील आहेत. मागील बाजूस शार्क-फिन अँटेना, मोठी विंडस्क्रीन आणि पूर्ण रुंदीचे टेललॅम्प आहेत.

पॉवरट्रेन कशी असेल?

ही Hyundai कार 2.0-L पेट्रोल आणि 1.6-L टर्बो-पेट्रोल इंजिन पर्याय आणि फ्रंट/ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टमसह सादर करण्यात आली आहे.

त्याचे इलेक्ट्रिक मॉडेल 48.4kWh किंवा 65.4kWh पॉवर पॅकसह फ्रंट-माउंट इलेक्ट्रिक मोटरसह ऑफर केले जाऊ शकते, जे अनुक्रमे 342 किमी आणि 490 किमी पर्यंत चालविण्यास सक्षम असेल.

Hyundai Kona फिचर्स

या SUV ला प्रीमियम सीटसह 5-सीटर केबिन मिळेल. ज्यामध्ये Apple CarPlay आणि Android Auto सपोर्टेड टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, डिजिटल इंस्ट्रुमेंटल कन्सोल, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मल्टिपल एअरबॅग्ज, पार्किंग कॅमेरा आणि सेन्सर्स याशिवाय व्हॉईस कमांड टेक्नॉलॉजी, एडीएएस फीचर्स आणि अॅम्बियंट लाइटिंग ही नवीन फिचर पाहू शकतात.

Hyundai Kona ची किंमत

या कारच्या किंमतीबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण अंदाजानुसार या SUV ची किंमत जवळपास 20 लाख रुपये ठेवली जाऊ शकते. दुसरीकडे, जर आपण लेटेस्ट Hyundai Kona SUV सोबतच्या स्पर्धेबद्दल बोलायचं झाल्यास ती सध्याच्या CX-30 शी स्पर्धा करेल. ज्याची एक्स-शोरूम किंमत 15,98,000 रुपये आहे. (Automobile)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Maharashtra Ganesh Visarjan Live: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गिरगाव चौपाटीवर दाखल

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

SCROLL FOR NEXT