Hyundai Motors
Hyundai Motors esakal
विज्ञान-तंत्र

Hyundai Motors या मोजक्या कारवर देत आहे जोरदार डिस्काउंट, लगेच बुक करा; होईल मोठी बचत

सकाळ ऑनलाईन टीम

Hyundai Motors : बाजरपेठांत रोज हजारोंच्या संख्येने कारची विक्री होत असते. लोक त्यांच्या बजेटनुसार त्यांची ड्रिम कार विकत घेतात.

तुम्ही ह्युंदाई कार विकत घेण्याचा विचार करत असाल तर या कंपनीच्या मोजक्या कारवर भारी डिस्काउंट ऑफर सुरू आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या कारवर किती सूट आहे ते.

भारतामध्ये सर्वाधिक कार विकणाऱ्यांच्या स्पर्धेत ह्युंदाई मोटर दुसऱ्या स्थानावर आहे. देशामध्ये अनेक मॉडेल्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

या महिन्यात ह्युंदाई मोटर ग्राहकांना त्यांच्या काही निवडक कारवर भारी डिस्काउंट देत आहे. चला जाणून घेऊया कोणत्या कारवर किती डिस्काउंट मिळत आहे.

ह्युंदाई ग्रँड आय 10 निओस (Hyundai Grand i10 NIOS)

Hyundai Motor Rs 10,000 चा एक्स्चेंज बोनस आणि Rs 3,000 ची कॉर्पोरेट सूट देत आहे, ग्रँड i10 Nios ही त्यांच्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या कारपैकी एक आहे.

म्हणजेच या कारच्या खरेदीवर ग्राहक 13,000 रुपयांपर्यंत बचत करू शकतात. Hyundai Grand i10 Nios ची एक्स-शोरूम किंमत 5.68 लाख रुपये आहे, तर त्याच्या टॉप मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 8.46 लाख रुपये आहे.

best budget cars

ह्युंदाई आय 20 (Hyundai i20)

Hyundai Motor i20 हॅचबॅकच्या Magna आणि Sportz या दोन प्रकारांवर सवलत देत आहे. या सवलतीच्या अंतर्गत, 10,000 रुपये रोख सवलत आणि 10,000 रुपये एक्सचेंज बोनस म्हणून उपलब्ध आहेत, म्हणजेच ग्राहक या कारच्या खरेदीवर 20,000 रुपयांपर्यंत बचत करू शकतात. या कारची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 7.19 लाख रुपये आहे, जी 11.83 लाख रुपयांपर्यंत जाते. (Automobile)

best budget cars

ह्युंदाई ऑरा (Hyundai Aura)

Hyundai त्यांच्या सेडान कार Aura वर एकूण 23,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे, ज्यात रु. 10,000 ची रोख सवलत, रु. 10,000 चे एक्सचेंज डिस्काउंट आणि रु. 3,000 कॉर्पोरेट सूट आहे.

तसेच, त्याच्या CNG प्रकारात ₹ 10,000 चा एक्सचेंज बोनस आणि ₹ 3,000 ची कॉर्पोरेट सूट मिळत आहे. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6.30 लाख रुपये आहे आणि टॉप मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 8.87 लाख रुपये आहे.

best budget cars

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: आशिष शेलारांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले महायुती मुंबईतील सर्व सहा जागा जिंकेल...

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

SCROLL FOR NEXT