How to Adjust Your Fridge Temperature for Monsoon Weather esakal
विज्ञान-तंत्र

Fridge Tips : पावसाळ्यात फ्रिजचं तापमान किती असावं? लिमिटपेक्षा जास्त ठेवल्यास होऊ शकतं मोठं नुकसान...जाणून घ्या

Monsoon Fridge Care : पावसाळा आला आहे आणि हवामान थोडं थंड झालं आहे. पण यासोबतच वाढलेली आर्द्रता आपल्या घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी विशेषतः रेफ्रिजरेटरसाठी त्रासदायक ठरू शकते.

Saisimran Ghashi

Refrigerator : पावसाळा आला आहे आणि हवामान थोडं थंड झालं आहे. पण यासोबतच वाढलेली आर्द्रता आपल्या घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी त्रासदायक ठरू शकते. विशेषतः रेफ्रिजरेटर!म्हणजेच आपला फ्रीज. योग्य तापमान न ठेवल्यास, रेफ्रिजरेटरमध्ये बॅक्टेरिया वाढू शकतात आणि अन्न खराब होऊ शकते.

पावसाळ्यात रेफ्रिजरेटरचे तापमान किती ठेवावे?

तज्ज्ञांच्या मते,रेफ्रिजरेटरचे तापमान कोणत्याही हंगामात 1.7 अंश ते 3.3 अंशांच्या दरम्यान असावे. विशेषतः पावसाळा किंवा इतर हिमवर्षाव हंगामात फ्रीजचे तापमान ५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवावे. हे तापमान अन्न ताजे आणि सुरक्षित ठेवण्यास मदत करते.

काही महत्वाच्या गोष्टी

  • रेफ्रिजरेटरचे तापमान नेहमी तपासत रहा. आपण थर्मामीटर वापरून ते तपासू शकता.

  • दरवाजा नेहमी घट्ट बंद ठेवा. थंड हवा बाहेर पडू नये आणि आर्द्रता वाढू नये याची खात्री करा.

  • गरम अन्न थंड झाल्यावरच फ्रीजमध्ये ठेवा. उष्ण अन्न ठेवल्याने फ्रीजमधील तापमान वाढू शकते आणि इतर अन्न खराब होऊ शकते.

  • पावसाळ्यात फ्रीजमध्ये जास्तीत जास्त ताजी फळे आणि भाज्या ठेवा. यामुळे आर्द्रता नियंत्रित राहण्यास मदत होते.

  • नियमितपणे फ्रीज स्वच्छ करा. यामुळे बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ रोखण्यास मदत होईल.

उच्च तापमानात फ्रीज वापरल्यास काय नुकसान होते?

अन्न लवकर खराब होते. त्याच बरोबर त्यातील पोशाक तत्वे निघून जातात.असे अन्न शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.अन्नावर बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ होते.ही बुरशी सहसा पहिल्या काही दिवसात दिवस नाही. पण आपण पाहतो किई बहुदा टोमॅटो फ्रीजमध्ये ठेऊन देखील खराब होतात. कारण त्याच्यामध्ये बॅक्टेरिया तयार झालेले असतात.जास्त तापमानात फ्रीज वापरल्यास विजेचा वापर वाढतो.

फ्रीजचे आयुष्य कमी होऊ शकते,कारण अश्याप्रकारे वापर केल्यामुळे तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता वाढते.योग्य तापमान राखून तुम्ही अन्न ताजे आणि सुरक्षित ठेवू शकता आणि फ्रीजची लाईफ देखील वाढवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहने करेक्ट कार्यक्रम केला! बेन स्टोक्स, जो रूटचा चतुराईने उडवला त्रिफळा; वोक्सही OUT

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठीचा आदर राखत अभिनेत्याने जिंकली कानडी मने

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात; सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT