Car tips sakal
विज्ञान-तंत्र

Car Tips: गाडीचा मायलेज वाढवायचा? फॉलो करा 'या' टिप्स

आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही कारचे माइलेज वाढवू शकता.

सकाळ डिजिटल टीम

Car Tips: देशात पेट्रोल डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढतच असतात. अशात कार चालविणे खुप महागडे झाले. अशात जर तुमची कार माइलेज देत नसेल तर तुमचे अधिक नुकसान होऊ शकते. म्हणून आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही कारचे माइलेज वाढवू शकता.

एक्सीलेटर, ब्रेक और क्लचचा योग्य वापर करा

एक्सीलेटर, ब्रेक और क्लच या तीन गोष्टींचा तुम्ही जर योग्य वापर केला तर तुमच्या कारचं मायलेज आणखी वाढेल. ड्राइव करताना क्लचवर वारंवार पाय ठेवू नका. हे तुमच्या इंजिन आणि माइलेजसाठी नुकसानदायक ठरू शकते. याशिवाय रोडप्रमाणे गेयर अॅडजस्ट करा. जर तुम्ही कमी गियर वर जास्त एक्सीलरेट करता तर माइलेज कमी होण्याची शक्यता असते. प्रयत्न करा की कमी ब्रेक लावा. वारंवार ब्रेक लावत एक्सीलरेट तेव्हा आणखी गाडीचं मायलेज कमी होते.

मेंटेनेंस और सर्विसेज

कारला योग्य प्रकारे मेंटेन करणे गरजेचे असते आणि वेळोवेळी सर्विसिंग करणे ही मायलेजसाठी चांगलं असतं. जर तुमची कार नवीन असेल तर वेळोवेळी सर्विस करा. जर तुमची जुनी असेल तर तुम्ही वर्षातुन एकदा किंवा 10000 किलोमीटरनंतर सर्विसिंग करा.

टायर प्रेशरची काळजी घ्या

गाड़ी चालवताना आपल्या टायर प्रेशरची काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुमच्या टायरमध्ये हवा कमी असेल तर तुमचं माइलेज ऑटोमेटिक कमी होणार. तुम्ही आठवड्यावतून एकदा टायर प्रेशर चेक करा. टायर प्रेशरची काळजी घेतल्याने तुमच्या कारची मायलेज वाढते.

स्पीड बॅलेंस ठेवा

जर तुम्ही आपल्या कारपासून चांगल्या माइलेजची अपेक्षा करता तर स्पीड ला मेंटेन नक्की ठेवा. प्रयत्न करा की जेव्हा तुम्ही ड्राइव करण्याचा प्रयत्न कराल तेव्हा एका निर्धारित स्पीडवरच चालवाल. जर तुम्ही वारंवार स्पीड कमी-जास्त करत असाल तर याचा परिणाम मायलेजवर होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cold Wave : पुणे तापमानात होतयं उणे, राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार; ४ दिवसांचा हवामान विभागाचा अंदाज आला समोर

Sangli Crime : सांगलीत चाललंय काय? जतमध्ये नग्नावस्थेत तोंड, डोके ठेचून तरुणाचा निर्घृण खून; डोक्यात गंभीर जखमा

Latest Marathi News Live Update : राज्यातील २४ नगरपरिषदांसाठी आज मतदान; कर्मचारी पोहोचले मतदान केंद्रांवर

Air Pollution : वाकड, रावेतला प्रदूषणाचा विळखा; आरएमसी प्लांटमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

'सुंदरा मनामध्ये भरली' फेम मराठी अभिनेत्रीची 'तस्करी'मध्ये एन्ट्री; इम्रान हाश्मीसोबत शेअर करणार स्क्रीन

SCROLL FOR NEXT