Hyperlocal Weather Forecasting App Launched by IIT Bombay esakal
विज्ञान-तंत्र

Mumbai Flood App: पुरावर मात करण्यासाठी मुंबईकर सज्ज! IIT ने बनवलं ॲप, तीन दिवस आधीच कळणार हवामान अंदाज

IIT Bombay Flood App : भारतीय तंत्रज्ञान संस्थान, मुंबई (IIT-B) आणि MCGM यांनी मिळून बनवलेली मुंबई फ्लड ॲप या नावाने प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.आता मुंबईकरांना त्यांच्या परिसरातील हवामानाची माहिती अगदी जलद मिळणार आहे.

Saisimran Ghashi

Mumbai Floods : दरवर्षी पुराशी झुंज देणाऱ्या मुंबईकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्थान, मुंबई (IIT-B) आणि MCGM यांच्या सहयोगाने असलेल्या या संस्थेने मुंबईसाठी स्थानिक हवामान अंदाज प्रणाली विकसित केली आहे. आता मुंबईकरांना त्यांच्या परिसरातील हवामानाची माहिती अगदी जलद आणि बरोबर मिळणार आहे.

भारतीय तंत्रज्ञान संस्थान, मुंबई (IIT-B) आणि MCGM यांनी मिळून बनवलेली मुंबई फ्लड ॲप (Mumbai Flood App) या नावाने प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. हे ॲप वापरून तुम्ही तुमच्या घराच्या गल्लीपासून ते संपूर्ण मुंबई शहरापर्यंतच्या पुढील 24 तासांचा हवामान अंदाज आणि पुढील तीन दिवसांचा अंदाज दररोज मिळवू शकणार आहात.

हे कसं शक्य झालं?

IIT बॉम्बेच्या शास्त्रज्ञांनी मुंबईच्या हवामान विभागाच्या (IMD) कोलाबा, सांताक्रुज आणि मरीन लाईन येथील मुख्य वेधशाळा आणि मुंबई आणि उपनगरांमधील 60 पेक्षा जास्त स्वयंचलित हवामान स्टेशन आणि पर्जन्यमापक स्टेशन्सचा डाटा वापरला आहे.

याशिवाय, अॅपमध्ये एक खास गोष्ट म्हणजे 'क्राउडसोर्सिंग' म्हणजेच लोकांकडून माहिती गोळा करण्याची सुविधा आहे. यात Mithi नदी आणि Vakola Nalaसारख्या नदी-नाल्यांच्या पाण्याच्या पातळीची माहिती नागरिकांकडून मिळवली जाते. वापरकर्ते त्यांचे स्थान, उंची आणि पाण्याची पातळी यांची माहिती अॅपवर अपलोड करू शकतात. ही माहिती त्वरित इतर नागरिकांना उपलब्ध होते.

मुंबई फ्लड ॲपची लिंक https://play.google.com/store/apps/details?id=com.mfws_react&pli=1 ही आहे. प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही app डाउनलोड करू शकता. तसेच पोर्टलची लिंक https://mumbaiflood.in/ ही आहे.

हा अॅप केवळ हवामान अंदाजच दाखवत नाही तर पूरविरोधी सतर्कताही देतो. यामुळे पूरस्थितीचा सामना करण्यासाठी मुंबईकरांना या नव्या अॅपची चांगली साथ मिळणार आहे.

मुंबईकरांसाठी मुंबईकरांनीच बनवलेली ही अॅप आहे. या अॅपद्वारे गोळा केलेला डाटा पुढील ऋतुमध्ये येणाऱ्या पुराचा सामना करण्यासाठी सरकारला मदत करेल, असं आय आयटी बॉम्बेचे प्राध्यापक सुबीमल घोष यांनी सांगितलं.

हे मुंबईच्या वाढत्या शहरीकरणाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठीचा एक महत्वाचा पाऊल आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि नागरिकांचा सहभाग यांच्या साहाय्याने मुंबई अधिक सुसज्ज होणार यात शंका नाही.मुंबईकरांना दरवर्षी पावसाचा आणि मोठ्या पुराचा सामना करावा लागतो. अनेक गाड्या अडकून पडतात, जीवित हानी होते, झाडे कोसळतात अशा अनेक घटना घडत असतात परंतु जर हवामानाबद्दल त्यांना पूर्वकल्पना मिळायला लागली तर या दुर्घटना होणे कमी होईल आणि त्यांना सुखरूप पणे राहता येईल अशी आशा आहे.

कारण या नव्या ॲपमुळे फक्त हवामानाचा अंदाजच सांगणार नाही तर त्याचबरोबर त्याच्याशी दोन हात करण्यासाठी साथ मिळणार आहे. नव्या ॲपमुळे नक्कीच मुंबईकरांना पाऊस आणि पुराच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी बळ मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi to Goa flight emergency Landing: मोठी बातमी! दिल्ली ते गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT