Internet Speed India eSakal
विज्ञान-तंत्र

Internet Speed : इंटरनेट डाउनलोड स्पीडमध्ये भारताने ब्रिटन-जपानलाही टाकलं मागे; ग्लोबल इंडेक्समध्ये घेतली मोठी झेप!

Speedtest Global Index : या यादीमध्ये भारताने तब्बल 72 स्थानांची झेप घेतली आहे.

Sudesh

पंतप्रधान मोदींच्या हस्ते भारतात 5G सेवेची सुरुवात करण्यात आली होती. यानंतर देशातील इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये भरपूर वाढ झाली आहे. जागतिक स्तरावर भारताने या बाबतीत जपान, ब्रिटन आणि ब्राझील अशा देशांनाही मागं टाकलं आहे.

ब्रॉडबँड आणि मोबाईल इंटरनेट नेटवर्क स्पीडची माहिती देणाऱ्या ओक्ला या संस्थेने ही आकडेवारी जाहीर केली आहे. जगातील सर्वाधिक इंटरनेट डाउनलोड स्पीड देणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारताने 72 स्थानांची झेप घेतली आहे. यानंतर स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्समध्ये भारत 47व्या स्थानावर पोहोचला आहे.

देशात 5G आल्यानंतर मोबाईल इंटरनेट डाउनलोड स्पीडममध्ये 3.59 टक्के वाढ दिसून आली आहे. सप्टेंबर 2022 मध्ये सरासरी डाउनलोड स्पीड हा 13.87 MBPS होता. ऑगस्ट 2023 मध्ये हा वाढून 50.21 MBPS एवढा झाला आहे.

भारत कोणत्या देशांच्या पुढे?

इंटरनेट डाउनलोड स्पीडच्या बाबतीत भारत हा इंडोनेशिया, बांग्लादेश, श्रीलंका, पाकिस्तान या शेजारी राष्ट्रांपेक्षा कित्येक स्थानांनी पुढे आहे. एवढंच नव्हे, तर मेक्सिको, तुर्किये, ब्रिटन, जपान, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका अशा जी-20 सदस्य देशांनाही भारताने मागं टाकलं आहे.

सर्वाधिक स्पीड कुठे?

या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर युनायटेड अरब इमिरातीज हा देश आहे. याठिकाणी सरासरी मोबाईल इंटरनेट स्पीड हा 210.89 MBPS एवढा आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कतार आणि तिसऱ्या क्रमांकावर कुवैत हा देश आहे. या यादीमध्ये चीन सहाव्या, तर अमेरिका 19 व्या क्रमांकावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोट्यवधींचा मालक असलेला गोविंदा सुनीतासोबत घटस्फोट झाल्यास किती देणार पोटगी? वेगळं होण्याचं नक्की कारण काय?

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

रात्रभर नोटा जाळत होता सरकारी इंजिनिअर तरी पैसे शिल्लक, छाप्यात सापडलं मोठं घबाड; कोट्यवधींच्या राखेसह रोकड जप्त

Vitamin D deficiency: व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास त्वचेवर दिसतात 'ही' 4 लक्षणे,करू नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT