इंटरनेट स्पीड sakal
विज्ञान-तंत्र

इंटरनेट स्पीडमध्ये पाकिस्तानच्या तुलनेत भारत कुठे आहे?

श्रीनिवास दुध्याल

काही बाबतीत भारत पाकिस्तानला वरचढ ठरतो तर काही बाबतीत पाकिस्तान भारताच्या कितीतरी पुढे असल्याचे दिसून येते.

भारत (India) आणि पाकिस्तानमध्ये (Pakistan) प्रत्येक आघाडीवर स्पर्धा पाहायला मिळते. काही बाबतीत भारत पाकिस्तानला वरचढ ठरतो तर काही बाबतीत पाकिस्तान भारताच्या कितीतरी पुढे असल्याचे दिसून येते. इंटरनेट स्पीडबद्दल (Internet Speed) बोलायचे झाल्यास याबाबतीत पाकिस्तान भारतापेक्षा अव्वल आहे. Ooka च्या सप्टेंबर 2021 च्या अहवालानुसार ही बाब समोर आली आहे.

Ooka च्या अहवालानुसार, भारताचा सरासरी डाउनलोडिंग मोबाईल इंटरनेट स्पीड 63.15 Mbps आहे, तर अपलोडिंग स्पीड 13.37 Mbps आहे. यादरम्यान latencies 36 ms होता. जर तुम्ही भारताची तुलना उर्वरित देशांशी केली तर या यादीतील 138 देशांमधून भारताचा 127 वा क्रमांक आहे. या यादीत भारतापेक्षा शेजारी देश पाकिस्तानची स्थिती चांगली आहे. 138 देशांमध्ये पाकिस्तानचा क्रमांक 117 वा आहे. गेल्या महिन्यापासून पाकिस्तानमध्ये तीन स्थानांची सुधारणा झाली आहे. तर भारताच्या रॅंकिंगमध्ये एका स्थानाने घट झाली आहे.

मागील महिन्याच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये भारत-पाकिस्तानमधील रॅंकिंग

  • नेपाळ : 110 व्या क्रमांकावर - 4 गुणांचा फायदा - 22.39 Mbps

  • पाकिस्तान : 117 व्या क्रमांकावर - 3 गुणांचा फायदा - 19.82 Mbps

  • भारत : 127 वे रॅंकिंग - 1 पॉइंट कमी - 17.89 Mbps

  • श्रीलंका : 128 वे रॅंकिंग - 2 गुणांची वाढ - 16.58 Mbps

टॉप 5 मोबाईल इंटरनेट स्पीड असलेले देश

  • यूएई : 238 एमबीपीएस

  • दक्षिण कोरिया : 202 Mbps

  • नॉर्वे : 177 Mbps

  • कतार : 172 Mbps

  • चीन - 165 Mbps

निश्‍चित ब्रॉडबॅंड स्पीड

फिक्‍स्ड ब्रॉडबॅंड स्पीडबद्दल पाहिल्यास, सप्टेंबर 2021 मध्ये सरासरी डाउनलोडिंग स्पीड 113.25 एमबीपीएस तर अपलोडिंग स्पीड 62.45 Mbps होता. ब्रॉडबॅंड स्पीडच्या बाबतीत भारताचे रॅंकिंग 181 देशांमध्ये 71 होते. या दरम्यान स्पीड 64.03 Mbps होता. ब्रॉडबॅंड स्पीडमध्ये भारताचे रॅंकिंग नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंकेपेक्षा चांगले आहे.

  • भारत : 71 व्या क्रमांकावर - 64.03 Mbps

  • नेपाळ : 108 वे रॅंकिंग - 33.87 Mbps

  • श्रीलंका : 124 व्या क्रमांकावर - 26.08 Mbps

  • पाकिस्तान : 160 वे रॅंकिंग - 13,84 Mbps

टॉप 5 ब्रॉडबॅंड स्पीड असलेले देश

  • मोनॅको : 261.82 Mbps

  • सिंगापूर : 255.83 Mbps

  • हॉंगकॉंग : 254.70 Mbps

  • रोमानिया : 232.17 Mbps

  • स्वित्झर्लंड : 299.96 Mbps

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT