AI in India eSakal
विज्ञान-तंत्र

AI in India : देशात वेगाने वाढतंय 'एआय' टॅलेंट! अमेरिका-चीनलाही टाकलं मागे; लिंक्ड-इनच्या अहवालात माहिती समोर

Linked-In Survey : टेक्नॉलॉजी नॉलेज वाढणाऱ्या टॉप-5 देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे.

Sudesh

भारतातील 'एआय' स्किल असणाऱ्या तरुणांमध्ये वेगाने वाढ होत असल्याचं समोर आलं आहे. लिंक्ड-इनने याबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे. विशेष म्हणजे, ही वाढ अमेरिका आणि चीनच्या तुलनेत अधिक असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

लिंक्ड-इन हे नोकरी शोधण्यासाठी, किंवा जॉब पोस्टिंगसाठी असणारं सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया अ‍ॅप आहे. याठिकाणी स्वतःच्या प्रोफाईलमध्ये लोक आपल्या नोकरीचा अनुभव, डिग्री आणि इतर कौशल्यांबाबत माहिती देतात. ही माहिती हायरिंग करणाऱ्यांना फायद्याची ठरते.

लिंक्ड-इनने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सात वर्षांमध्ये आपल्या प्रोफाईलमध्ये एआय स्किल्सची माहिती देणाऱ्या भारतीय अकाउंट्सची संख्या 14 टक्क्यांनी वाढली आहे. यामुळे टेक्नॉलॉजी नॉलेज वाढणाऱ्या टॉप-5 देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. भारतासोबत या यादीमध्ये सिंगापूर, फिनलँड, आयर्लंड आणि कॅनडा या देशांचा समावेश आहे. अमेरिका-चीन अशा देशांचा क्रमांक भारताच्याही बराच मागे आहे.

रिटेल, एज्युकेशन, फायनान्स अशा सर्व क्षेत्रांमधील टेक्निकल नॉलेजचा यात समावेश करण्यात आळेला आहे. गेल्या वर्षामध्ये 43 टक्के भारतीयांनी आपल्या कंपनीत एआयचा वापर वाढला असल्याचं सांगितलं. यामुळेच एकूण वर्कफोर्सपैकी 60 टक्के कर्मचाऱ्यांनी एआय कौशल्ये आत्मसात केली आहेत. तर, यामध्ये 71 टक्के 'जेन-झी'चा समावेश आहे.

सॉफ्ट स्किलमध्ये वाढ

केवळ टेक्निकल नाही, तर सॉफ्ट स्किलमध्ये देखील वाढ करण्याला भारतीय कर्मचारी प्राधान्य देत असल्याचं समोर आलं आहे. जगभरातील एकूण 72 टक्के टॉप एक्झिक्युटिव्ह यावर भर देत आहेत, तर हीच संख्या भारतात 91 टक्के असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

एआयचा वापर वाढणार

या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे, की भारतातील सुमारे 57 टक्के अधिकारी आपल्या कंपन्यांमध्ये एआयचा वापर करण्याच्या तयारीत आहेत. लिंक्ड-इनचे कंट्री मॅनेजर आशुतोष गुप्ता यांनी याबाबत माहिती दिली.

ते म्हणाले, "भविष्यात एआयचा वापर वाढत जाणार आहे. तसंच, तंत्रज्ञानाच्या वापरासोबत सॉफ्ट स्किल देखील महत्त्वाचे ठरणार आहेत. यामुळेच एकीकडे भारतातील तरुण एआय बाबत ज्ञान वाढवत असतानाच, इंटरपर्सनल स्किल्सही वाढवत आहेत. आपण आता एआयच्या जगात असलो, तरी अधिक ह्यूमन-सेंट्रिक काम करणार आहोत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT