Who is Anil Menon indian Origin Nasa Astronaut esakal
विज्ञान-तंत्र

Anil Menon : सुनीता विल्यम्सनंतर भारतीय वंशांचे आणखी एक अंतराळवीर रचणार इतिहास; लवकरच घेणार अवकाश झेप, कोण आहेत अनिल मेनन?

Anil Menon indian Origin Nasa Astronaut : नासाचे भारतीय वंशाचे अंतराळवीर अनिल मेनन 2026 मध्ये त्यांच्या पहिल्या अंतराळ मोहिमेवर जाणार आहेत. ते आठ महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर संशोधन व प्रयोगांमध्ये सहभाग घेणार आहेत.

Saisimran Ghashi
  • सुनीता विल्यम्सनंतर अनिल मेनन अंतराळात झेप घेणारे पुढचे भारतीय-अमेरिकन अंतराळवीर ठरणार आहेत.

  • ते २०२६ मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर ८ महिन्यांची मोहीम पार पाडणार आहेत.

  • वैद्यक, अभियांत्रिकी व अंतराळ विज्ञान यांचा समन्वय असलेली त्यांची कारकीर्द प्रेरणादायक आहे.

Anil Menon NASA Mission : सुनीता विल्यम्सनंतर आता आणखी एका भारतीय मूळाच्या अमेरिकन अंतराळवीराने इतिहास घडवण्याची तयारी सुरू केली आहे. नासाने अंतराळवीर अनिल मेनन यांची 2026 मध्ये होणाऱ्या अंतराळमोहिमेसाठी निवड केली असून ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) आठ महिने काम करणार आहेत. विशेष म्हणजे याच वेळी भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला ISS वर कार्यरत असताना मेननदेखील त्यांच्यामागोमाग अंतराळ स्थानकात झेप घेणारे दुसरे भारतीय बनतील.

Astronaut Anil Menon

जून 2026 मध्ये ऐतिहासिक झेप

अनिल मेनन हे जून 2026 मध्ये कझाकस्तानमधील बायकानूर कोस्मोड्रोम येथून "रोसकोसमॉस सोयूज एमएस-29" या अंतराळयानातून प्रक्षेपित होणार आहेत. या मोहिमेसाठी रशियन अंतराळवीर प्योत्र डुब्रॉव आणि अन्ना किकीना हे देखील त्यांच्यासोबत असतील. तीनही अंतराळवीर मिळून जवळपास आठ महिने ISS वर वास्तव्य करत विविध वैज्ञानिक प्रयोग व तंत्रज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून मानवाच्या दीर्घकालीन अंतराळयात्रेसाठी आवश्यक माहिती गोळा करणार आहेत.

अनिल मेनन हे 2021 मध्ये नासाच्या 23 व्या अंतराळवीर गटात निवडले गेले. 2024 मध्ये त्यांनी अधिकृतपणे अंतराळवीर म्हणून पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी आपली पहिली अंतराळमोहिम साध्य करण्यासाठी सखोल प्रशिक्षण घेतले आहे. मेनन यांची शैक्षणिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमी अत्यंत वैविध्यपूर्ण आणि प्रभावी आहे ते एक आपत्कालीन वैद्यकशास्त्राचे तज्ज्ञ, यांत्रिकी अभियंता आणि युनायटेड स्टेट्स स्पेस फोर्सचे कर्नल आहेत.

वैद्यकीय आणि अंतराळविज्ञानातील भक्कम योगदान

मिनेसोटामधील मिनिआपोलिसमध्ये जन्मलेले अनिल मेनन यांचे वडील भारतीय आणि आई युक्रेनियन आहेत. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून न्यूरोबायोलॉजीमध्ये पदवी, स्टॅनफोर्ड विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण व यांत्रिकी अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांना आपत्कालीन वैद्यकशास्त्र व एअरोस्पेस मेडिसिन या दोन्ही क्षेत्रात सल्लागार मान्यता प्राप्त आहे.

ते SpaceX कंपनीचे पहिले फ्लाइट सर्जन होते आणि नासाच्या Demo-2 मोहिमेच्या वेळी त्यांनी क्रू ड्रॅगन यानाच्या प्रक्षेपणात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या वैद्यकीय कौशल्याचा उपयोग करत त्यांनी SpaceX साठी भविष्याच्या मानवी अंतराळयात्रांसाठी आवश्यक वैद्यकीय पायाभूत सुविधा विकसित केल्या.

इतक्या जबाबदाऱ्या सांभाळतानाही मेनन अजूनही टेक्सासमधील मेमोरियल हर्मन मेडिकल सेंटरमध्ये आपत्कालीन वैद्यकशास्त्राचे उपचार करत राहतात आणि युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात. ते एक प्रशिक्षित पायलट असून त्यांच्या नावे 1,000 पेक्षा अधिक तासांचे उड्डाणाचे अनुभव आहे. त्यांना अ‍ॅडव्हेंचर रेसिंग, आयर्नमॅन स्पर्धा व कोकोरो सारख्या कठीण चाचणांमध्ये भाग घेण्याची आवड आहे. त्यांच्या पत्नी अ‍ॅना मेनन या देखील SpaceX मध्ये काम करतात. या दाम्पत्याला दोन मुले आहेत.

भविष्यातील अंतराळवीरांसाठी प्रेरणा

2014 पासून अनिल मेनन यांची नासासोबतची कारकीर्द सुरू झाली. त्यांनी आयएसएस आणि सोयूज मोहिमांमध्ये फ्लाइट सर्जन म्हणून काम केले. त्यांच्या संशोधनातून आणि वैद्यकीय सेवेमधून त्यांनी 20 पेक्षा जास्त वैज्ञानिक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत.

अनिल मेनन यांचा अंतराळप्रवास केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातून नव्हे, तर भारतीय-अमेरिकन वारशाचा अभिमानही आहे. त्यांच्या कार्याने भविष्यातील अनेक अंतराळवीरांना प्रेरणा मिळणार आहे. या ऐतिहासिक मोहिमेसाठी देशवासीयांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे आणि संपूर्ण जगाचे लक्ष 2026 मधील या अंतराळयात्रेकडे लागले आहे.

FAQ

१. अनिल मेनन कोण आहेत?
अनिल मेनन हे भारतीय वंशाचे अमेरिकन अंतराळवीर असून ते डॉक्टर, अभियंता आणि युएस स्पेस फोर्सचे कर्नल आहेत.

२. अनिल मेनन अंतराळात कधी जातील?
ते जून २०२६ मध्ये सोयूज MS-29 अंतराळयानातून अंतराळात झेप घेणार आहेत.

३. अंतराळ स्थानकावर ते काय काम करणार?
ते फ्लाइट इंजिनिअर म्हणून वैज्ञानिक प्रयोग व तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिके सादर करतील.

४. अनिल मेनन यांची पार्श्वभूमी काय आहे?
त्यांनी हार्वर्ड, स्टॅनफोर्डसारख्या प्रतिष्ठित विद्यापीठांतून शिक्षण घेतले असून ते आपत्कालीन वैद्यकशास्त्र व एअरोस्पेस तज्ज्ञ आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT