Revolutionary 1-Minute Charging Technology Discovered esakal
विज्ञान-तंत्र

Ankush Gupta Research : मोबाईल लॅपटॉप अन् इलेक्ट्रिक कार.. १० मिनिटात चार्ज होणार ; भारतीय संशोधकाने बनवले 'हे' तंत्रज्ञान

Technology Research : अमेरिकेच्या विद्यापीठात कार्यरत भारतीय शास्त्रज्ञाने केले संशोधन

सकाळ डिजिटल टीम

Technology : आधुनिक तंत्रयुगात सर्वात जास्त वेळ कोणत्या कामासाठी लागतो? उत्तर आहे - इलेक्ट्रॉनिक उपकरण चार्ज करण्यासाठी! पण असं झालं तर तुमच्या मोबाईलला किंवा लॅपटॉपला आता फक्त एका मिनिटात चार्ज करता आलं तर? अविश्वासार्ह वाटतंय ना? पण हे खरं आहे!

अमेरिकेच्या कलोराडो विद्यापीठात कार्यरत भारतीय शास्त्रज्ञ अंकुर गुप्ता यांनी एक नवीन तंत्रज्ञान शोधून काढलं आहे. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपण आपल्या मोबाईल आणि लॅपटॉपला फक्त एका मिनिटात चार्ज करू शकतो. इतकंच नाही तर याच तंत्राचा वापर करून आपल्या इलेक्ट्रिक कारची बॅटरी देखील फक्त १० मिनिटांत चार्ज होऊ शकते.

तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? तर अंकुर गुप्ता यांनी केलेल्या संशोधनात त्यांनी विद्युत प्रवाहित होणारी अतिसूक्ष्म कण (ions) यांच्या हालचालींचा अभ्यास केला. त्यांनी आढावलं की या कणांची चार्जिंग आणि डिस्चार्जिंगची गती वाढवून सुपरकॅपेसिटरसारख्या डिव्‍हाइसेसमध्ये ऊर्जा साठवण्याची आणि वापरण्याची क्षमता वाढवता येऊ शकते. सोप्या भाषेत सांगायचं तर या कणांच्या जलद गतीमुळे चार्जिंगचा वेग वाढतो.

या शोधामुळे आत्तापर्यंत शिकलेल्या किर्चॉफचा नियम देखील पुन्हा व्याख्यायित होतो. या नियमामध्ये विद्युत प्रवाहाबाबत माहिती दिली जाते. पण अंकुर गुप्ता यांच्या संशोधनानुसार आयन हे कण वेगळ्या पद्धतीने वाहत असतात. त्यांची गती आणि दिशा इलेक्ट्रिक फील्ड आणि डिफ्यूजन या दोन्ही गोष्टींवर अवलंबून असते.

या शोधामुळे मोबाईल आणि गाड्यांच्या चार्जिंग तंत्रज्ञानामध्ये क्रांती होण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर ऊर्जा क्षेत्रातील अनेक समस्या सुटण्यास देखील याचा उपयोग होऊ शकतो. थोडक्यात, अंकुर गुप्ता यांचं हे संशोधन निश्चितच भविष्यातील तंत्रज्ञानाचा पाया घालणारं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT