Infinix laptop
Infinix laptop sakal
विज्ञान-तंत्र

खास विद्यार्थ्यांसाठी Infinix laptop लॉन्च

नमिता धुरी

मुंबई : इन्फिनिक्स या ट्रांसियॉन ग्रुपच्या प्रिमिअम ब्रॅण्डने विद्यार्थ्यांसाठी बहुप्रतिक्षित लॅपटॉप इनबुक एक्स१ निओ २४,९९० रूपये या आकर्षक दरामध्ये लॉन्च केला आहे. नवीन इनबुक एक्स१ निओ विभागातील वजनाने हलका आणि सर्वात मजबूत लॅपटॉप म्हणून लक्षवेधक प्रभाव निर्माण करण्यासाठी लॉन्च करण्यात आला आहे.

हा लॅपटॉप शक्तिशाली अनुभवासह अमर्यादित मल्टीमीडिया लर्निंगसाठी जलद चार्जिंग सपोर्ट देतो. फक्त १.२४ किग्रॅ वजनासह १४.८ मिमी जाडी असलेल्या या लॅपटॉमध्ये इंटेल सेलेरॉन क्वॉड कोअर एन५१०० प्रोसेसरची शक्ती आहे आणि हा ८ जीबी + २५६ जीबी व्हेरिएण्टमध्ये येतो. हा लॅपटॉप फ्लिपकार्टवर उपलब्ध असून सिटी, आरबीएल, कोटक व अॅक्सिस बँक या बँकांकडून बँक ऑफर्स देखील आहेत.

इन्फिनिक्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कपूर म्हणाले, "आजच्या हायब्रिड अध्ययन वातावरणामध्ये पीसींची वाढती लक्षणीय भूमिका पाहता आम्ही नवीन इन्फिनिक्स इनबुक एक्स१ निओ लॉन्च करत आहोत, जो डिजिटल विद्यार्थ्यांना दैनंदिन टास्क्ससाठी आवश्यक असलेली कार्यक्षमता देण्याकरिता डिझाइन करण्यात आला आहे.

इनबुक एक्स१ निओ मध्ये शक्तिशाली कार्यक्षमतेसाठी इंटेल सेलेरॉन प्रोसेसरची शक्ती आहे आणि हा कॉस्मिक ब्ल्यू व स्टारफॉल ग्रे या दोन आकर्षक रंगांमधील लक्षवेधक अॅल्युमिनिअम अलॉई आधारित मेटल बॉडीसह येतो.”

जलद कार्यक्षमता आणि व्यापक स्टोरेज: टॉप-स्पीड कार्यक्षमता देण्यासाठी इंटेल सेलेरॉन प्रोसेसर विद्यार्थ्यांना सहयोग, निर्मिती, अध्ययन करण्यामध्ये, तसेच गेम्स खेळण्यामध्ये मदत करण्यासाठी इनबुक एक्स१ निओला अभूतपूर्व शक्ती देतो.

या लॅपटॉपमध्ये जवळपास ८ जीबी रॅम आणि जवळपास २५६ जीबी एम.२ एनव्हीएमई पीसीआयई ३.०एसएसडीची व्यापक स्टोरेज क्षमता आहे, ज्यामधून सामान्यत: हेवी लॅपटॉप्स व पीसींमध्ये आढळून येणा-या पारंपारिक एचडीडी स्टोरेजपेक्षा ५ पट जलद इंटर्नल स्टोरेज ड्राइव्हची खात्री मिळते.

लक्षणीय बॅटरी बॅकअप : ५० डब्ल्यूएच उच्च-क्षमतेची बॅटरी असलेला इन्फिनिक्स इनबुक एक्स१ निओ लॅपटॉप क्लासमध्ये नोट्स, असाइनमेंट्स टाइप करण्यासाठी, नोट्स शेअर कण्यासाठी आणि दीर्घकाळापर्यंत प्रकल्पांवर ग्रुप्ससोबत काम करण्यासाठी लॅपटॉप्सची गरज असलेल्या महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. हा लॅपटॉप विनाव्यत्यय जवळपास ११ तासांचे वेब ब्राऊजिंग, ९ तासांचे नियमित काम आणि ९ तासांचे व्हिडिओ प्लेबॅक देतो.

वजनाने हलका असण्यासह उच्च दर्जाचा व्युईंग अनुभव : नवीन इन्फिनिक्स इनबुक एक्स१ निओ लॅपटॉपमध्ये अॅल्युमिनिअम अलॉई-आधारित मेटल बॉडी आहे, ज्यामुळे डिवाईसचे वजन फक्त १.३४ किग्रॅ आहे. तसेच १४.८ मिमी जाडी डिवाईसला विद्यार्थ्यांना सुलभपणे त्यांचे महाविद्यालय व शाळांमध्ये घेऊन जाण्यासाठी अत्यंत पोर्टेबल व टिकाऊ बनवते.

या लॅपटॉपमध्ये १४-इंच फुल एचडी+ आयपीएस डिस्प्लेसह ३०० नीट्स सर्वोच्च ब्राइटनेस आणि १०० टक्के सुपर आरजीबी कलर रिप्रॉडक्शन आहे. यामुळे डिवाईस घर व कार्यालयीन वापरासाठी परिपूर्ण आहे. युजर्स मुलभूत गेम्स देखील खेळू शकतात आणि नेटफ्लिक्स व अॅमेझॉन प्राइम सारख्या सेवांमधून व्हिडिओ स्ट्रिमिंगचा आनंद घेऊ शकतात.

इन्फिनिक्स इनबुक एक्स१ निओमध्ये व्हिडिओ कॉल्स व मीटिंग्ससाठी एचडी वेबकॅमसोबत द्विस्तरीय स्टिरिओ स्पीकर्स व प्रगत डीटीएस साऊंड तंत्रज्ञान आहे, ज्यामधून व्हिडिओ पाहताना किंवा गेम्स खेळताना सर्वोत्तम साऊंड अनुभवाची खात्री मिळते.

पण युजर्सना अंधुक प्रकाशात देखील वैयक्तिक व्हिडिओ कॉल्स किंवा झूम मीटिंग्स घेण्यासाठी लॅपटॉपमध्ये ड्युअल-स्टार लाइट कॅमेरा वैशिष्ट्य आणि टाइपिंग करताना सुधारित दृश्यमानतेसाठी बॅकलिट कीबोर्ड आहे.

या लॅपटॉपमध्ये विविध कनेक्टीव्हीटी पोर्ट्स आहेत, जसे दोन यूएसबी ३.० पोर्ट्स, डेटा ट्रान्सफरसाठी दोन यूएसबी टाइप-सी पोर्ट व फुल फंक्शनसाठी एक पोर्ट, एचडीएमआय १.४ पोर्ट, एसडी कार्ड रीडर आणि ३.५ मिमी हेडरेस्ट व मायक्रोफोन कॉम्बो जॅक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahavikas Aghadi : विधानसभेसाठीही एकजूट; ‘मविआ’चा निर्धार

India Aghadi : राहुल गांधींवर ‘इंडिया’चा दबाव

Heavy Rain : पावसामुळे सिक्कीममध्ये हाहाकार! रस्ते खचले, नऊ जणांचा मृत्यू,‘तिस्ता’ची पातळी वाढली

Sasoon Hospital : मेफेड्रोन प्रकरणाचा तपास ‘एनसीबी’कडे; मुख्य सूत्रधार संदीप धुनिया मात्र अद्याप फरार

Mahayuti Leaders : महायुतीच्या नेत्यांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध; आमदारांची नाराजी दूर करण्याचा शिवसेना, राष्ट्रवादीचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT