Infinix Zero 5G
Infinix Zero 5G  
विज्ञान-तंत्र

Infinix Zero 5G : कमी किमतीत 5G फोन शोधताय? हा ठरु शकतो बेस्ट ऑप्शन

सकाळ डिजिटल टीम

Infinix Zero 5G हा स्मार्टफोन येत्या 14 फेब्रुवारी रोजी भारतात लॉन्च होणार आहे. पण याआधीही Infinix च्या या 5G फोनचे डिटेल्स समोर आले आहेत. झिरो 5G डायमेंशन 900 हे 13 5G बँड, LPDDR5 RAM आणि UFS 3.1 स्टोरेज सारख्या मुख्य फीचर्ससह हा फोन लॉंच केला जाणार आहे. आता लेटेस्ट लीक मध्ये या डिव्हाइसचे सर्व फीचर्स सांगण्यात आले आहेत. चला तर मग Infinix Zero 5G ची किंमत आणि सर्व डिटेल्स जाणून घेऊया

Infinix Zero 5G स्पेसिफिकेशन्स

लीकमध्ये असे म्हटले आहे की, Infinix Zero 5G मध्ये 6.7-इंचाचा FHD+ डिस्प्ले असू शकतो जो 1080 x 2460 पिक्सेलचे फुल HD+ रिझोल्यूशन, 20:9 आस्पेक्ट रेशो आणि 120Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. पुढील बाजूस, ड्युअल-एलईडी फ्लॅशसह 16-मेगापिक्सेल कॅमेरा दिला आहे.

Infinix Zero 5G च्या मागील कॅमेरा सेटअपमध्ये 48-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 2x झूम सपोर्टसह 12-मेगापिक्सेल लेन्स आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. मागील कॅमेरे ड्युअल-एलईडी फ्लॅशसह जोडलेले आहेत. Dimensity 900 सह येणारा हा डिव्हाइस 6GB/8GB RAM सह येऊ शकतो. दोन्ही व्हेरिएंटमध्ये 128 GB नेटिव्ह स्टोरेज दिले जाऊ शकते. 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 5,000mAh बॅटरी असू शकते. यात साइड-माउंट केलेले फिंगरप्रिंट स्कॅनर असल्याचे देखील समोर आले आहे.

Infinix Zero 5G ची भारतात अपेक्षित किंमत

Infinix Zero 5G भारतात 20,000 रुपये (~$267) पेक्षा कमी किमतीत लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. या किंमतीच्या टॅगसह, तो Tecno POVA 5G, Lava AGNI 5G, Redmi Note 11T, Realme 8s 5G आणि आगामी Realme 9 Pro सारख्या समान किंमतीच्या 5G फोनशी स्पर्धा करेल. लॉन्च झाल्यानंतर हा हँडसेट फ्लिपकार्टद्वारे खरेदीसाठी उपलब्ध होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT