Instagram  Sakal
विज्ञान-तंत्र

Instagram Reels : भारतीयांसाठी Instagram ची खास दिवाळी ऑफर, रील्स बनवा अन्...

या ऑफरद्वारे युजर्सना लाखो रुपये कमावण्याची संधी देण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

How to Earn Money From Instagram : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram हळूहळू फोटो शेअरिंगवरून लहान व्हिडिओं बनविण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. गेल्या 2 वर्षात कंपनीने याकडे पूर्ण लक्ष केंद्रित केले असून, यासाठी अनेक नवीन फीचर्सदेखील जोडण्यात आले आहेत. Tiktok शी स्पर्धा करण्यासाठी कंपनीकडून अशाप्रकारची पाउलं उचलली जात आहे. अधिकाधिक युजर्स याकडे आकर्षिक व्हावे यासाठी कंपनीकडून भारतीयांसाठी खास दिवाळी ऑफर देण्यात आली आहे. या ऑफरद्वारे युजर्सना लाखो रुपये कमावण्याची संधी देण्यात आली आहे. आज आपण याच खास ऑफरबद्दल जाणून घेणार आहोत.

कंपनीची ऑफर नेमकी काय?

मेटाने या प्लेटफॉर्मसाठी Reels Play Bonus ऑफर भारतात लॉन्च केली आहे. या ऑफर अंतर्गत व्हिडिओ बनवणाऱ्या युजर्सना 5000 डॉलरपर्यंत म्हणजेच सुमारे 4 लाख रुपयांचा बोनस देण्यात आली आहे. आतापर्यंत ही ऑफर केवळ यूएसमधील युजर्ससाठीच देण्यात आली होती. मात्र, आता या ऑफरचा लाभ भारतीय युजर्सलादेखील घेता येणार आहे. या ऑफरमुळे भारतीय कंटेंट क्रिएटर्सला ब्रांड स्पॉन्सरशिप आणि एफिलिएट प्रोग्रामशिवाय थेट मेटामधून पैसे कमविण्याची संधी मिळणार आहे. या ऑफरच्या माध्यमातून इंस्टाग्राम त्यांच्या युजर्सला अधिकाधिक रील्स बनवण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. लहान व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर टिकटॉकला पिछाडीवर टाकून इन्टाला आघाडी गाठण्याचा मानस आहे.

अशी आहे ऑफर

कंपनीने जाहीर केलेल्या ऑफर अंतर्गत युजर्सने रील्स बनवल्यानंतर संबंधित बोनस युजर्सच्या संख्येवर अवलंबून असणार आहे. यामध्ये 165M पर्यंत काउंट मोजला जाणार आहे. बोनससाठी 150 पर्यंत रील्स आवश्यक असून, बोनस मिळवण्यासाठी युजर्सकडे कमाल बोनससाठी 1 महिन्यापर्यंतचा कालावधी असेल. कंपनीकडून देण्यात येणारा बोनस 11 नोव्हेंबर 2022 पूर्वी अॅक्टिवेट केला जाऊ शकतो. युजर्सच्या रील्सला 30 दिवसांत 1000 व्ह्यू मिळणे गरजेचे आहे. असे झाल्यास संबंधित युजर्सला लाखोंचा बोनस मिळवण्याची उत्तम संधी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT