Threads App Glitch eSakal
विज्ञान-तंत्र

Threads App Glitch : पहिल्याच दिवशी थ्रेड्स अ‍ॅपमध्ये ग्लिच! यूजर्सनी पुन्हा धरली ट्विटरची वाट; शेअर केले स्क्रीनशॉट

हे अ‍ॅप ट्विटरला पर्याय ठरणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होत्या.

Sudesh

ट्विटरला टक्कर देण्यासाठी इन्स्टाग्रामने थ्रेड्स हे अ‍ॅप लाँच केलं होतं. या अ‍ॅपवर पहिल्याच दिवशी यूजर्सना मोठ्या प्रमाणात ग्लिच दिसून येत आहेत. त्यामुळे यूजर्सनी पुन्हा ट्विटरची वाट धरली आहेत. या ग्लिचचे कित्येक स्क्रीनशॉट लोकांनी ट्विट केले आहेत.

इन्स्टाग्रामकडून तयार करण्यात आलेलं हे अ‍ॅप ट्विटरला पर्याय ठरणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होत्या. अगदी मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी देखील ११ वर्षांनंतर ट्विट करत इलॉन मस्कला डिवलचं होतं. मात्र, आता यूजर्सना या अ‍ॅपमध्ये ग्लिच दिसून येत आहेत.

ट्विटरवर स्क्रीनशॉट व्हायरल

यूजर्सनी थ्रेड्समधील ग्लिचचे कित्येक स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर करण्यास सुरूवात केली आहेत. कित्येक यूजर्सनी याचे व्हिडिओही शेअर केले आहेत. 'आता थ्रेड्स अनइन्स्टॉल करणार आहे', असं कित्येक यूजर्स म्हणत आहेत.

या ग्लिचमुळे यूजर्सना स्क्रीनवर कोणतीही गोष्ट नीट दिसत नाहीये. एका पोस्टवर दुसरी पोस्ट किंवा यूजरनेम ओव्हरलॅप झालेलं दिसत आहे. काही यूजर्सच्या स्क्रीनशॉटमध्ये तर सगळी स्क्रीनच अस्पष्ट दिसत आहे. यामुळे आता लाँचच्या पहिल्याच दिवशी या अ‍ॅपवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.

काही तासांमध्ये लाखो डाऊनलोड

लाँच केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच २ दशलक्ष यूजर्सनी हे अ‍ॅप डाऊनलोड केलं होतं. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी याबाबत माहिती दिली आहे. कित्येक सेलिब्रिटींनी देखील या अ‍ॅपवर आपलं खातं उघडलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट ! हवामान खात्याचा मोठा इशारा, जाणून घ्या राज्यात आज कसे असेल हवामान?

Krishna Sugar Factory: कृष्णा कारखान्यासाठी आजपासुन धुमशान; उमेदवारी अर्ज आजपासुन २२ मे पर्यंत दाखल करता येणार, भोसले विरुद्ध मोहिते पुन्हा संघर्ष..

Satara Politics: सातारा पालिकेतील वादावर शिवेंद्रसिंहराजेंचा दणका; उदयनराजेंनंतर शिवेंद्रसिंहराजेंचीही बैठक, 'निवडून आणलं, पाडूही शकतो'..

मोठी बातमी! ग्रामीणमधील नववी-दहावीच्या 20 विद्यार्थ्यांसाठी 3 शिक्षक; शहरांमधील 300 शाळांना लावावे लागणार कुलूप; प्रत्येक वर्गात 20 पटसंख्येची अट

Panchang 18 May 2026 : पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रदर्शन आणि सर्वार्थसिद्धी योग माहिती

SCROLL FOR NEXT