3D avatars for Instagram
3D avatars for Instagram Sakal
विज्ञान-तंत्र

Instagramवर मिळणार 3D अवतार! नव्या फिचरमुळे युजर्स खूश

सकाळ डिजिटल टीम

3D avatars for Instagram: सध्याचं युग हे सोशल मीडियाचं (Social Media) युग आहे. त्यातही इंस्टाग्रामला (Instagram) तरुण वर्गाची पहिली पसंती असल्याचं पाहायला मिळते. मेटा कंपनीच्या या फोटो शेअरिंग अ‍ॅपमध्ये अनेक फिचर्स आहेत. त्यामुळे हे अ‍ॅप सध्याच्या युवा वर्गामध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. दरम्यान इंस्टाग्राम युजर्ससाठी एक गुडन्यूज आहे. लवकरच इंस्टाग्रामवर प्लॅटफॉर्मवर एक नवं फिचर (Feature) येणार आहे. या फिचरच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा 3D अवतार पाहायला मिळेल. (Instagram will get 3D avatars! Users are surprised to learn about the new feature)

Instagram वर पाहायला मिळणार 3D अवतार-

मेटा (Meta) आपल्या सर्व प्लॅटफॉर्ममध्ये सातत्याने सुधारणा करत असते. त्याचाच एक भाग म्हणून आता Instagram च्या वापरकर्त्यांना '3D अवताराचं नावाचं एक नवं फिचर मिळणार आहे. या फिचरच्या माध्यमातून यूजर्सना त्यांच्या आवडत्या सोशल मीडिया अ‍ॅपवर स्वतःचा 3D अवतार मिळवता येणार आहे.

3D अवतार कसा असेल?

आता Instagram वर युजर्सना स्वतःचा 3D अवतार मिळवता येणार आहे. वापरकर्त्यांना चेहऱ्याच्या विविध आकारांनुसार विविध पर्याय दिले जातील. प्रतिमा अधिक वास्तविक दिसण्यासाठी, वापरकर्त्याना त्यांच्या चेहऱ्याचा आकार कस्टमाईज करण्याचा पर्याय देखील दिला जाईल. दिव्यांग लोकांना या वैशिष्ट्याचा खरा अनुभव देण्यासाठी कंपनीने या अवतारांमध्ये इम्प्लांट, व्हीलचेअर आणि श्रवणयंत्र यांसारखी उपकरणे आणि वस्तूंचाही समावेश केला आहे.

हे फिचर कसं वापरायचं-

आता हे फिचर कसं वापरायचा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्यासाठी तुम्ही इंस्टाग्राम स्टोरीज फिचर आणि डायरेक्ट मेसेजेस (DMs) मध्ये 3D अवतार हे फिचर वापरू शकता. युजर्सना त्यांच्या स्टिकर फीड पोस्ट आणि प्रोफाइल चित्रांमध्ये देखील हे वैशिष्ट्य वापरता येईल. सध्या हे फिचर फक्त अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोचे युजर्स वापरू शकतात. भारतासह इतर देशांमध्ये हे फिचर किती दिवसात येईल, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 3D अवतारचे हे फिचर Meta ने Facebook आणि Facebook Messenger साठी देखील उपलब्ध केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''अजित पवारांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही'' राज ठाकरे पुण्यात नेमकं काय म्हणाले?

T20 WC 2024 : 24 मे पूर्वी चार दिवस आधी... बीसीसीआयचा मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना दिलासा

Sai Sudarshan GT vs CSK : साई सुदर्शनने केला मोठा विक्रम; सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागं

GT vs CSK Live IPL 2024 : गुजरात टायटन्सने सीएसकेला दिले 232 धावांचे आव्हान

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरुंगातून सुटका, 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन

SCROLL FOR NEXT