Instagram Read Receipts eSakal
विज्ञान-तंत्र

Instagram New Feature : आता इन्स्टाग्रामवर देखील मिळणार व्हॉट्सअ‍ॅपचं महत्त्वाचं फीचर; चॅटिंग करताना होणार फायदा

Instagram Read Receipts : हे फीचर उपलब्ध झाल्यानंतर प्रायव्हसी सेटिंगमध्ये याबाबत ऑप्शन मिळणार आहे.

Sudesh

तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप वापरत असाल, तर तुम्हाला 'रीड रिसिप्ट' हे फीचर माहिती असेल. समोरच्या व्यक्तीने तुमचा मेसेज वाचला आहे की नाही हे डबल ब्लू टिकमुळे समजतं. व्हॉट्सअ‍ॅपवर हे 'ब्लू टिक' बंदही करता येतं. त्यामुळे आपण मेसेज वाचला आहे की नाही हे समोरच्या व्यक्तीला समजत नाही. आता अशाच प्रकारचं फीचर इन्स्टाग्रामवर देखील येणार आहे.

सध्या या फीचरची चाचणी सुरू असल्याची माहिती इन्स्टाग्रामचे प्रमुख अ‍ॅडम मोसेरी यांनी दिली आहे. इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप हे दोन्ही अ‍ॅप्स मेटाच्या मालकीचे आहेत. मोसेरी यांनी सांगितलं, की हे फीचर ऑप्शनल असणार आहे. रीड रीसिप्ट चालू ठेवायची की बंद याचा निर्णय यूजर्सना घेता येणार आहे.

हे फीचर उपलब्ध झाल्यानंतर प्रायव्हसी सेटिंगमध्ये याबाबत ऑप्शन मिळणार आहे. यासोबतच इन्स्टाग्रामच्या मेन्यूमध्ये देखील काही बदल करण्यावर काम सुरू आहे. हे फीचर कधी लाँच होणार याबाबत मोसेरी यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. (Tech News)

व्हॉट्सअ‍ॅपवर दिसणार जाहिराती?

दरम्यान व्हॉट्सअ‍ॅप ब्राझीलचे प्रमुख विल कॅथकार्ट यांनी एक मोठी माहिती दिली आहे. इन्स्टाग्रामप्रमाणेच आता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये देखील जाहिराती दिसण्याची शक्यता आहे. या जाहिराती चॅनल्स आणि स्टेटसमध्ये दिसू शकतात असे संकेत विल यांनी दिले आहेत. हे कधीपासून होणार याबाबत कोणतीही माहिती त्यांनी दिली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT