iPhone 15 India Price eSakal
विज्ञान-तंत्र

iPhone 15 Price : आयफोन 15 लाँच! भारतात किती असणार किंमत? कधी होणार उपलब्ध?

iPhone 15 India Price : आयफोन-15 सीरीजमधील फोन तुम्ही 15 सप्टेंबरपासून प्री-बुक करू शकाल.

Sudesh

अ‍ॅपलचा वार्षिक इव्हेंट काल (12 सप्टेंबर) पार पडला. यामध्ये कित्येक नव्या प्रॉडक्ट्सची घोषणा करण्यात आली. मात्र, यामध्ये मुख्य आकर्षण ठरला iPhone 15. या सीरीजमधील चार मॉडेल लाँच करण्यात आले आहेत. अपेक्षेप्रमाणे यामध्ये कित्येक मोठे अपडेट्स देण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आयफोन-15 सीरीजमधील फोन तुम्ही 15 सप्टेंबरपासून प्री-बुक करू शकाल. या दिवशी सायंकाळी 5.30 वाजता याची बुकिंक सुरू होईल. 22 सप्टेंबरपासून हे भारतात विक्रीसाठी उपलब्ध होतील.

किती आहे किंमत?

iPhone 15 च्या 128GB मॉडेलची किंमत भारतात 79,900 रुपये आहे. तर 256GB व्हेरियंटची किंमत 89,990 रुपये आहे. यातील हाय-एंड 512GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 1,09,900 रुपये आहे.

iPhone 15 Plus च्या 128GB व्हेरियंटची किंमत 89,900 रुपये आहे. 256GB व्हेरियंटची किंमत 99,900 रुपये आहे. तर, यातील हाय-एंड 512GB व्हेरियंटची किंमत 1,19,900 रुपये आहे.

आयफोन 15 आणि आयफोन 15 प्लस हे मॉडेल पाच कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये ब्लू, पिंक, येलो, ग्रीन आणि ब्लॅक हे पर्याय उपलब्ध आहेत. या दोन्ही फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. तर, यातील प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे.

प्रो मॉडेल्स

iPhone 15 Pro मॉडेलच्या 128GB बेस व्हेरियंटची किंमत 1,34,900 रुपये आहे. तर, 256GB व्हेरियंटची किंमत 1,44,900 रुपये आहे. 512GB व्हेरियंटची किंमत 1,64,900 एवढी आहे. यामध्ये 1TB व्हेरियंट देखील उपलब्ध आहे, ज्याची भारतात किंमत 1,84,900 रुपये आहे.

iPhone 15 Pro Max याचं बेस मॉडेलच 256GB स्टोरेज ऑप्शनसह मिळेल. याची किंमत भारतात 1,59,900 रुपये आहे. तर, 512GB व्हेरियंटची किंमत 1,79,900 रुपये आहे. हाय-एंड 1TB व्हेरियंटची किंमत 1,99,900 रुपये आहे.

आयफोन 15 प्रो आणि प्रो मॅक्स या दोन्हीमध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये नॅचरल टायटेनियम, ब्लू टायटेनिमय, ब्लॅक टायटेनियम आणि व्हाईट टायटेनियम असे चार कलर ऑप्शन्स मिळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT