iPhone 15 Update eSakal
विज्ञान-तंत्र

iPhone 15 Update : लाँच केल्यानंतर लगेच विक्रीसाठी उपलब्ध होईल 'मेड-इन-इंडिया' आयफोन-15; रिपोर्टमध्ये दावा

Apple Wonderlust Event : लाँचच्या दिवशीच आयफोनची विक्री सुरू करण्याची अ‍ॅपलची ही पहिलीच वेळ असणार आहे.

Sudesh

Made in India iPhone 15 : अ‍ॅपलचा नवीन आयफोन कधी लाँच होणार याची फॅन्सना कित्येक दिवसांपासून उत्सुकता लागून होती. अवघ्या काही तासांमध्ये अ‍ॅपलचा 'वाँडरलस्ट' इव्हेंट सुरू होईल. या इव्हेंटमध्ये आयफोन-15 सीरीज लाँच करण्यात येणार आहे.

आज (12 सप्टेंबर) अ‍ॅपलचा मोठा इव्हेंट पार पडणार आहे. या इव्हेंटमध्ये iPhoone 15 हे मुख्य आकर्षण असणार आहे. यासोबतच या कार्यक्रमात नवीन अ‍ॅपल वॉच, अन्य प्रॉडक्ट्स लाँचिंग आणि सॉफ्टवेअर अपडेट्सची घोषणा होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 10:30 वाजता हा इव्हेंट सुरू होईल.

आयफोन 15 सीरीजबाबत आधीपासून भरपूर चर्चा सुरू आहे. लीक्स आणि मीडिया रिपोर्ट्सच्या माध्यमातून या फोनबाबत कित्येक दावे केले जात आहेत. ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, लाँचनंतर आजपासूनच 'मेड-इन-इंडिया' आयफोनची विक्री सुरू होणार आहे.

भारतीय यूजर्सना फायदा

यापूर्वी भारतीय यूजर्सना नवीन आयफोन लाँच झाल्यानंतर, तो भारतात येण्यासाठी वाट पहावी लागत होती. मात्र, आता भारतातच तयार झालेल्या आयफोनची विक्री होणार असल्यामुळे, लाँचनंतर लगेच भारतीय मार्केटमध्ये हा फोन उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, लाँचच्या दिवशीच आयफोनची विक्री सुरू करण्याची अ‍ॅपलची ही पहिलीच वेळ असणार आहे.

किती असेल किंमत?

आयफोन 15 भारतात तयार केला असल्यामुळे त्याची किंमत कमी असू शकते असा अंदाज काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र, मागील पॅटर्न पाहता, अ‍ॅपल असं काही करेल याबाबत साशंकता आहे. आयफोन 15 च्या टॉप मॉडेलची किंमत ही आयफोन 14 प्रो मॅक्सच्या तुलनेत सुमारे 100 डॉलर्सने महाग असू शकते, असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT