iPhone issue eSakal
विज्ञान-तंत्र

iPhone issue : रात्रीच्या वेळी आपोआप बंद पडतायत आयफोन; जगभरातील यूजर्स करतायत तक्रार

iOS 17 issue : ज्या यूजर्सच्या आयफोनमध्ये iOS 17.0.3 ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे, त्यांना ही अडचण येत आहे.

Sudesh

आयफोन यूजर्सच्या अडचणी संपता संपत नाहीत असं दिसतंय. अ‍ॅपलने नवीन आयफोन 15 सीरीज लाँच केल्यानंतर त्यामध्ये हीटिंग इश्यू येत होता. आता आयफोनचे कित्येक मॉडेल्स रात्रीच्या वेळी आपोआप बंद होत असल्याची तक्रार यूजर्स करत आहेत. हे सर्व डिव्हाईस iOS 17 या ऑपरेटिंग चालणारे आहेत.

काही आयफोन यूजर्सने एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत तक्रार केली आहे. आपल्या बॅटरी यूजेस ग्राफच्या मदतीने यूजर्सना समजलं, की रात्रीच्या वेळी काही तासांसाठी हा फोन आपली सर्व अ‍ॅक्टिव्हिटी बंद करत आहे. पहाटेच्या अलार्मपूर्वी हे फोन पुन्हा सुरू होत आहेत. iPhone 15 Pro Max, 14 Pro, iPhone 13, iPhone SE Gen 1 आणि इतर काही मॉडेल्समध्ये देखील ही समस्या दिसत आहे.

फोन चार्ज करताना येतो इश्यू

ज्या यूजर्सच्या आयफोनमध्ये iOS 17.0.3 ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे, त्या यूजर्सना ही अडचण येत आहे. त्यातही जे यूजर्स झोपताना फोन चार्जिंगला लावत आहेत, त्या यूजर्सचा फोन आपोआप बंद होत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

आपला फोन तपासा

तुमच्या फोनला देखील अशा प्रकारची अडचण येत आहे की नाही हे पाहण्यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. यासाठी सर्वप्रथम सेटिंग्समध्ये जा. त्यानंतर बॅटरी यूसेज हा पर्याय निवडून, Last 24 Hours या ऑप्शनवर टॅप करा. यानंतर तुम्हाला तुमच्या आयफोनच्या बॅटरीचा मागील 24 तासांचा उपयोग दिसेल. जर तुमच्या फोनमध्येही हा इश्यू येत असेल, तर रात्रीच्या वेळी काही तास बॅटरी ग्राफमध्ये गॅप दिसेल.

ऑपरेटिंग सिस्टीममध्ये त्रुटी

अ‍ॅपल कंपनीने आपल्या नव्या आयफोन 15 सीरीजसोबतच iOS 17 लाँच केली होती. यानंतर यामध्ये ओव्हरहीटींगची समस्या दिसत होती. याव्यतिरिक्त काही यूजर्सना आपल्या आयफोनच्या स्क्रीनवर हिरव्या रंगाची रेष दिसत असल्याची अडचण येत आहे. यानंतर आता हा बॅटरीचा इश्यू देखील समोर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT