Apple iPhone Settlement eSakal
विज्ञान-तंत्र

iPhone Settlement : 'या' आयफोन यूजर्सना कंपनी देणार तब्बल 5 हजार रुपये! जुन्या खटल्याच्या निकालानंतर कोर्टाने दिले निर्देश

iPhone Compensation : अ‍ॅपलने काही वर्षांपूर्वी आपल्या ठराविक आयफोनच्या परफॉर्मन्समध्ये बदल केला होता.

Sudesh

अ‍ॅपल कंपनी आपल्या काही आयफोन यूजर्सना 5 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम देणार आहे. एका जुन्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर, कंपनीला कोर्टाने याबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे यूजर्सना नुकसान भरपाई म्हणून ही रक्कम मिळणार आहे.

310 मिलियन डॉलर्सची भरपाई

एका प्रकरणाचा निकाल अ‍ॅपल कंपनीच्या विरोधात लागला आहे. यानुसार भरपाई म्हणून कंपनी आपल्या आयफोन यूजर्सना एकूण 500 मिलियन डॉलर्सची भरपाई करण्याचे आदेश दिले होते. कंपनीने मात्र केवळ 310 मिलियन डॉलर्सची भरपाई करणार असल्याचं मान्य केलं आहे. यामुळे प्रत्येक यूजरला 65 डॉलर्स एवढी रक्कम मिळेल. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी याबाबत माहिती दिली आहे.

काय आहे प्रकरण?

अ‍ॅपलने काही वर्षांपूर्वी आपल्या ठराविक आयफोनच्या परफॉर्मन्समध्ये बदल केला होता. बॅटरी आणि प्रोसेसर संबंधित तक्रारी दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, यामुळे त्या आयफोन मॉडेल्सचा परफॉर्मन्स स्लो झाला होता.

हा निर्णय घेण्याचं कारण म्हणजे, कित्येक यूजर्सनी अ‍ॅपलकडे आयफोनबाबत तक्रार केली होती. या यूजर्सचे फोन चार्जिंग शिल्लक असूनही बंद पडत होते. ही तक्रार दूर करण्यासाठी कंपनीने सॉफ्टवेअर अपडेट केलं होतं. मात्र, यानंतर या आयफोनचा परफॉर्मन्स खराब झाल्याचं दिसून आलं. यामुळे कंपनीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

कोणाला मिळणार पैसे?

मिळालेल्या माहितीनुसार, iOS 10.2.1 आणि त्यापुढील ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणारे iPhone 6, 6 Plus, 6s, 6s Plus आणि SE या आयफोन यूजर्सना मोबदल्याची रक्कम मिळू शकते. या यादीमध्ये iOS 11.2 आणि त्यापुढील ओएस असणाऱ्या iPhone 7 आणि iPhone 7 plus या मॉडेल्सचाही समावेश आहे.

अर्थात केवळ 21 डिसेंबर 2017 पूर्वी ज्यांनी हे आयफोन खरेदी केले होते त्यांनाच मोबदल्याची रक्कम मिळणार आहे. ही रक्कम कशा प्रकारे देण्यात येईल, किंवा कधीपर्यंत दिली जाईल याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईकरांचा त्रास कमी होणार! पाऊस थांबताच काँक्रीटीकरणाला सुरुवात; पालिकेची खड्डेमुक्त शहराकडे वाटचाल

कसोटी ते वन डे कर्णधार! रोहित शर्माला हटवून Shubman Gill ला पुढे आणण्याची Inside Story

DMart Shopping Tips : तुम्ही डिमार्टला जाता अन् बिल तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त येतं का? तर या टीप्स नक्की फॉलो करा

Nashik Kumbh Mela : कुंभमेळा कामे दर्जेदारच हवीत! गुणवत्ता आणि पारदर्शकतेबाबत मुख्यमंत्र्यांच्या सक्त सूचना

Latest Marathi News Live Update: शेतकर्‍यांना आज मदतीची गरज- शरद पवार

SCROLL FOR NEXT