IPL Season
IPL Season esakal
विज्ञान-तंत्र

IPL 2023 : आता मॅच पाहण्यासाठी Hotstar ची गरज नाही, यंदा IPL बघा ऑनलाइन; कसं ते जाणून घ्या..

सकाळ डिजिटल टीम

तुम्हाला हवी ती मॅच तुम्ही घरी बसून अगदी फ्री बघू शकता. आजपासून आयपीएलचा सीजन (IPL Season) सुरू होतोय.

तुम्ही IPL चे चाहते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण, आता तुम्हाला IPL मॅच पाहण्यासाठी कोणत्याही OTT अॅपची गरज नाहीये.

कारण, तुम्हाला हवी ती मॅच तुम्ही घरी बसून अगदी फ्री बघू शकता. आजपासून आयपीएलचा सीजन (IPL Season) सुरू होतोय. यावेळी पहिली मॅच चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात होणार आहे. आता मॅच फ्री बघण्यासाठी काय कराल?

तर मॅच फ्री बघण्यासाठी Jio सिनेमावर लाइव्ह स्ट्रीम करू शकता. या व्यतिरिक्त जे युजर त्यांच्या जिओ रिचार्ज प्लॅनवर जिओ सिनेमाचा अ‍ॅक्सेस घेतात ते सहजपणे या फ्री मॅचचा लाभ घेऊ शकतात. तुम्ही या मॅच 4k रेझोल्युशनमध्ये पाहू शकता. या मॅचेस देशभरातील 12 भाषांमध्ये प्रसारित होतील. तुम्ही यासाठी तुमचा मोबाईल, टॅब आणि लॅपटॉप वापरू शकता.

जिओ यूजर्स 'हा' प्लान घेऊ शकतात

Jio 399 प्लॅन : या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या क्रिकेट प्लॅनची ​(​Jio Plan) वैधता मिळते. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 6GB डेटा मिळतो. याशिवाय, या प्लॅनमध्ये तुम्ही अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचाही लाभ घेऊ शकता.

जिओ 999 प्लॅन : 84 दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये तुम्हाला दररोज 3GB डेटा मिळतो. याशिवाय तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि Jio TV, Jio Cinema चे सबस्क्रिप्शनचा लाभ मिळेल.

जिओ 296 प्लॅन : या प्लानची वैधता 30 दिवसांची आहे. यामध्ये तुम्हाला 25GB डेटा मिळतो. शिवाय, तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज 100 एसएमएसचा लाभ मिळतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला Jio TV, Jio Cinema च्या सबस्क्रिप्शनचाही फायदा मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT