Driving dress code in India facts vs myths  esakal
विज्ञान-तंत्र

Driving Dress Code : हाफ शर्ट घालून किंवा अर्धनग्न होऊन गाडी चालवल्यास दंड होतो का? जाणून घ्या काय आहे नियम..

Driving dress code in India facts vs myths : गाडी चालवताना हाफ शर्ट, चप्पल, लुंगी घातल्यास दंड होतो अशी अफवा आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया

Saisimran Ghashi

थोडक्यात..

  • खासगी वाहनचालकांसाठी कोणताही ड्रेस कोड कायद्यात नाही.

  • व्यावसायिक चालकांसाठी खाकी ड्रेस आणि बूट घालणे अनिवार्य आहे.

  • चप्पल घालून गाडी चालवणे बेकायदेशीर नसले तरी अपघातदृष्ट्या धोकादायक आहे.

नुकताच मनसे नेत्याचा मुलगा आणि राजश्री मोरे त्यांच्यातील वाद चर्चेचा विषय बनला होता. यातून अनेकांना प्रश्न पडला गाडी चालवताना आपण कोणते कपडे घालतो, यावर कायद्याने बंधन आहे का? अलीकडे एका व्हायरल घटनेनंतर असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. विशेषतः शर्ट न घालता किंवा चप्पल घालून वाहन चालवणे, यावर कायदेशीर कारवाई होते का? हे जाणून घेऊया

सामान्य नागरिक वाहन चालवताना कोणतेही कपडे घालू शकतात. मोटार वाहन कायद्यात खासगी वाहन चालकांसाठी कोणताही विशिष्ट ड्रेस कोड नाही. त्यामुळे हाफ शर्ट, बनियान किंवा लुंगी घालून गाडी चालवली तरी त्यावर दंड होणार नाही.

जर तुम्ही टॅक्सी, ट्रक, ऑटो रिक्षा किंवा इतर व्यावसायिक वाहन चालवत असाल, तर तुमच्यासाठी खाकी रंगाचा ड्रेस, बेल्ट आणि चामड्याचे बूट घालणे बंधनकारक आहे. हा नियम फक्त व्यवसायिक वाहनचालकांसाठी आहे.

चप्पल घालून गाडी चालवल्यास काय होऊ शकते?

कायद्याने चप्पल घालून वाहन चालवणे गुन्हा नाही, परंतु हे सुरक्षित नाही. चप्पलमुळे पाय स्लिप होण्याचा धोका असतो, विशेषतः पावसाळ्यात. त्यामुळे अशा प्रसंगी एखादी दुर्घटना घडल्यास अप्रत्यक्षरीत्या जबाबदारी ठरू शकते. त्यामुळे बूट घालून वाहन चालवणे अधिक सुरक्षित आहे.

अफवांपासून सावध राहा!

२०१९ मध्ये मोटार वाहन कायद्यात सुधारणा झाल्यानंतर काही अफवा पसरल्या की, हाफ शर्ट, बनियान, लुंगी घालून वाहन चालवले तर दंड होईल. या अफवांवर स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने सोशल मीडियावर खुलासा करताना म्हटलं होतं "अशा अफवांपासून सावध रहा!" अशा प्रकारच्या कपड्यांवर कोणताही कायदेशीर दंड किंवा कारवाईची तरतूद नाही.

FAQs

  1. मी बनियान घालून दुचाकी चालवली तर दंड होईल का?
    नाही, सामान्य नागरिकांसाठी असा कोणताही नियम नाही.

  2. टॅक्सी किंवा ट्रक चालकांसाठी ड्रेस कोड आहे का?
    होय, व्यावसायिक चालकांना खाकी ड्रेस, बेल्ट आणि बूट घालणे बंधनकारक आहे.

  3. चप्पल घालून गाडी चालवल्यास पोलिस चलन फाडू शकतात का?
    नियम नाही, पण जर त्यामुळे अपघात झाला तर कारवाई होऊ शकते.

  4. मोटार कायद्यात कपड्यांबाबत स्पष्ट नियम आहेत का?
    व्यावसायिक चालकांसाठी नियम आहेत, सामान्य नागरिकांसाठी नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT