Chandrayaan 3 Update eSakal
विज्ञान-तंत्र

Chandrayaan 3 Returns Home : 'चांद्रयान-3'ची घरवापसी! प्रॉपल्शन मॉड्यूल पृथ्वीच्या कक्षेत परतलं; इस्रोचा प्रयोग यशस्वी

ISRO Moon Mission : चांद्रयान-3 मोहिमेच्या माध्यमातून भारताने इतिहास रचला होता.

Sudesh

Chandrayaan 3 Update : चांद्रयान-3 मोहिमेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. चांद्रयान-3 मधील प्रॉपल्शन मॉड्यूल आता पृथ्वीच्या कक्षेत परत आलं आहे. इस्रोने आपल्या एक्स हँडलवरुन याबाबत माहिती दिली. अशा प्रकारचा प्रयोग आपण पहिल्यांदाच केला, आणि तो यशस्वी झाल्याचं इस्रोने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आपण पृथ्वीवरुन चंद्रावर गोष्टी पाठवण्यास तर सक्षम आहेच. मात्र, चंद्रावरुन पृथ्वीवर काही परत आणण्यासही आपण सक्षम असल्याचं इस्रोने या प्रयोगातून सिद्ध केलं आहे. इस्रोने ज्याप्रकारे चांद्रयान पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या कक्षेत ढकललं होतं. त्याचप्रकारे मॅन्यूव्हर पार पाडत आता चांद्रयान-3 च्या प्रॉपल्शन मॉड्यूलला चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत आणण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे, इस्रोने पहिल्यापासून याची योजना आखली नव्हती. ज्याप्रमाणे विक्रम लँडरची दुसरी उडी ही अगदी अनपेक्षितरित्या यशस्वी ठरली, त्याप्रमाणेच हा प्रयोगही यशस्वी ठरला आहे.

भारताने रचला इतिहास

14 जुलै 2023 रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून चांद्रयान-3 चे प्रक्षेपण करण्यात आले होते. 23 ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करून भारताने नवा इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारा भारत पहिलाच देश ठरला. यानंतर चांद्रयान-3 ने पुढील 14 दिवस अपेक्षित डेटा गोळा करून ही मोहीम फत्ते केली होती.

प्रज्ञान-विक्रम चिरनिद्रेत

चांद्रयान-3 मधील प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर हे चंद्रावर चिरनिद्रा घेत आहेत. मोहीम पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्लीप मोडवर ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर चंद्रावर रात्र सुरू झाल्यामुळे हे दोन्ही डिव्हाईस फ्रीज झाले. पुन्हा सूर्योदय झाल्यानंतर लँडर-रोव्हरला सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, याला अपयश मिळालं. यानंतर हे मिशन पूर्णपणे संपल्याची घोषणा करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhanorkar Join BJP: रविंद्र चव्हाणांचा विराट शो! धानोरकरांचा भाजपात प्रवेश, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा किल्ला कोसळला

मोदी सरकारचा मोठा निर्णय! Asia Cup 2025 स्पर्धेतील India vs Pakistan लढत होणार की नाही? फैसला झाला

तिला स्मशानात जळायचं नव्हतं... आईच्या गूढ मृत्यूबद्दल पहिल्यांदाच बोलली पूजा बेदी; म्हणाली, 'ती अचानक गायब झाली...

Stock Market Closing: शेअर बाजार वाढीसह बंद; सलग सहाव्या दिवशी तेजी, कोणते शेअर्स चमकले?

Bail Pola 2025: डिजेपासून बैलांना त्रास! शेतकऱ्यांना ‘ॲनिमल राहत’कडून १० सूचना

SCROLL FOR NEXT