K. Sivan ISRO journey eSakal
विज्ञान-तंत्र

K. Sivan : इस्रोमधून एके काळी लावलं होतं हाकलून.. पुढे जाऊन झाले थेट प्रमुख!

ISRO Ex Chairman : के. सिवान यांनी आपल्या इस्रोमधील प्रवासाबद्दल माहिती सांगितली.

Sudesh

इस्रोचे माजी प्रमुख के. सिवान यांना आज संपूर्ण देश ओळखतो. भारताच्या चांद्रयान मोहिमांसाठी त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. मात्र याच सिवान यांना चक्क इस्रोच्या सॅटेलाईट सेंटरने 'गेट आऊट' म्हणून बाहेर हाकललं होतं. सिवान यांनी स्वतः हा किस्सा सांगितला आहे.

सिवान यांनी सांगितलं, की "पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर जेव्हा मी नोकरी शोधत इस्रोच्या सॅटेलाईट सेंटरमध्ये गेलो होतो. यावेळी मला 'यूजसेल' म्हणत तिथून हाकलून लावलं होतं. मात्र, त्यानंतर मला इस्रोच्या रॉकेट सेंटरमध्ये नोकरी मिळाली.. आणि कालांतराने मी इस्रोचा प्रमुखही झालो."

के. सिवान यांनी आपल्या प्रवासाबद्दल काही माहिती सांगितली. ते म्हणाले, की आयुष्यात मला जे करायचं होतं, त्यापेक्षा वेगळीच गोष्ट करावी लागली आहे. बारावीनंतर मला BE करायचं होतं, तर वडिलांकडे पुरेसे पैसे नसल्यामुळे मला BSc करावं लागलं. त्यानंतर MSc करायचं होतं, तर तेव्हा BE करावं लागलं. यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करुन मी नोकरी शोधायला लागलो.

जे कुणालाच जमलं नाही, ते केलं

इस्रोचे प्रमुख पद सांभाळण्यापूर्वी के. सिवान हे जिओसिन्क्रोनस सॅटेलाईट लाँच व्हेईकल (GSLV) या प्रोजेक्टचे संचालक होते. त्यांना जेव्हा हा प्रोजेक्ट मिळाला, तेव्हा सहकाऱ्यांनी त्यांचं अभिनंदन करण्याऐवजी सहानूभूती देखील दर्शवली. ही ऑफर स्वीकारल्याबद्दल कित्येक सहकाऱ्यांनी त्यांना मूर्ख देखील म्हटलं. याला कारण म्हणजे, GSLV प्रोजेक्ट हा यापूर्वी चार वेळा अयशस्वी झाला होता.

के. सिवान यांनी मात्र अथक मेहनतीने पहिल्याच प्रयत्नात ही मोहीम यशस्वी करुन दाखवली. आज भारताला हवामान ते संरक्षण अशा सर्व क्षेत्रांमध्ये याचा फायदा होतो आहे.

अपयशानंतर मानली नाही हार

'चांद्रयान-2'चं लँडिंग अयशस्वी झाल्यानंतर कदाचित सगळ्यात जास्त दुःख के. सिवान यांनाच झालं असेल. त्यांचा रडतानाचा फोटो यावेळी व्हायरल झाला होता. मात्र, सिवान यांनी हार न मानता; दुसऱ्याच दिवशी चांद्रयान-3 मोहिमेवर काम सुरू केलं होतं. पंतप्रधान मोदींनीही दुसऱ्याच दिवशी या प्रोजेक्टला मंजूरी दिली होती, असं सिवान यांनी सांगितलं.

ही चांद्रयान-3 मोहीम यावर्षी भारताने यशस्वीपणे पार पाडली. या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारा भारत पहिलाच देश ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price Hike: दिवाळीच्या आधीच महागाईचा तडाखा; एलपीजी गॅसचे दर वाढले, तुमच्या शहरात किती झाली किंमत?

Latest Marathi News Live Update : पिकाचा पंचनामा करताना तलाठ्याला सर्पदंश

Video: अन् त्याने जोरात आईला ओढलं; तीन वर्षांच्या चिमुकल्याने पाच सेकंदात वाचवला आईचा जीव

Kids Health: लठ्ठ मुलांना प्रौढावस्थेत आरोग्याचा गंभीर धोका 'या' समस्या उद्‍भवण्याचा तज्ज्ञांचा इशारा

Shivaji Maharaj Video: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील रिझर्व बँक पाहिली का? व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT