ISRO New Mission eSakal
विज्ञान-तंत्र

ISRO New Mission : चंद्र-सूर्यानंतर आता ब्लॅक होलचा अभ्यास करणार इस्रो; नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी लाँच होणार मिशन

ISRO XPoSat Mission : एक जानेवारी रोजी सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी ही मोहीम लाँच होईल. यासाठी इस्रोच्या विश्वासार्ह पीएसएलव्ही रॉकेटचा वापर करण्यात येईल.

Sudesh

ISRO to study Black Holes : या वर्षात चांद्रयान-3 सह कित्येक मोहीमा यशस्वी करुन इस्रोने संपूर्ण जगाला आपली दखल घ्यायला लावली. यानंतर 2024 च्या पहिल्याच दिवशी इस्रो आपली पुढची मोहीम लाँच करणार आहे. ब्लॅक होल्स, म्हणजेच कृष्णविवरांचा अभ्यास करण्यासाठी इस्रो एक्सपोसॅट मिशन लाँच करणार आहे. (ISRO New Mission)

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, हे देशाचं पहिलंच एक्स-रे पोलारीमीटर सॅटेलाईट (एक्सपोसॅट) असणार आहे. एक जानेवारी रोजी सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी ही मोहीम लाँच होईल. यासाठी इस्रोच्या विश्वासार्ह पीएसएलव्ही (PSLV) रॉकेटचा वापर करण्यात येईल.

काय आहे उद्दिष्ट?

एक्सपोसॅट मोहीमेचा (XPoSat Mission) उद्दिष्ट विश्वातील सर्वाधिक चमकदार अशा 50 प्रकाशस्त्रोतांचा अभ्यास करणे आहे. यामध्ये पल्सर्स, ब्लॅक होल एक्स-रे बायनरीज, अ‍ॅक्टिव्ह गॅलेक्टिक न्यूक्लेई, न्यूट्रॉन स्टार्स आणि नॉन थर्मल सुपरनोव्हा अवशेष यांचा समावेश आहे. एक्सपोसॅट उपग्रह हा पृथ्वीच्या खालच्या वर्तुळाकार कक्षेत स्थिरावण्यात येईल. तो 500 ते 700 किलोमीटर त्र्यिज्येत पृथ्वीभोवती फिरेल. कमीत कमी पाच वर्षे तो अंतराळाचा अभ्यास करेल.

यामध्ये दोन पेलोड (XpoSat Payloads) पाठवण्यात येणार आहेत. यात POLIX हे उपकरण पोलरायझेशनचे पॅरामीटर मोजण्याचं काम करेल. सोबतच पोलरायझेशनचे डिग्री आणि अँगलही ते तपासेल. XSPECT हे उपकरण 0.8 ते 0.15 केव्ही एनर्जी रेंजमधील स्पेक्ट्रोस्कोपिक माहिती देईल. ही उपकरणे रामन रिसर्च इन्स्टिट्यूट आणि यूआर राव सॅटेलाईट सेंटरने मिळून तयार केली आहेत.

जगातील दुसरीच अशी मोहीम

एक्सपोसॅट ही जगातील दुसरीच अशी मोहीम आहे. यापूर्वी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने 2021 साली इमेजिंग एक्स-रे पोलारिमेट्री एक्सप्लोरर लाँच केलं होतं.

मिळणार नवी माहिती

या मोहिमेमुळे आपल्याला ब्रह्मांडाबाबत अधिक माहिती मिळणार आहे. केवळ कृष्णविवरेच नाही, तर इतर सौरमाला आणि त्यातील ग्रहांबाबत देखील महत्त्वपूर्ण माहिती या मोहिमेमुळे मिळणार आहे.

आदित्य एल-1

दरम्यान, भारताची पहिली सौरमोहीम देखील यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. 'आदित्य' यान हे 6 किंवा 7 जानेवारी रोजी एल-1 या पॉइंटवर पोहोचणार आहे. याठिकाणी प्रस्थापित झाल्यानंतर ते सूर्याचा अभ्यास सुरू करेल. (Aditya L1 Update)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, MI vs RCB : बंगळुरूने मारलं वानखेडेचं मैदान, मिळवला तिसरा विजय; मुंबई इंडियन्सची पराभवाची हॅट्रिक

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं काय चुकतंय? RCB विरूद्धच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने स्पष्टच सांगितलं

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

SCROLL FOR NEXT