PSLV-C61 Mission failure reason isro explanation esakal
विज्ञान-तंत्र

PSLV-C61 Fail : भारताची PSLV-C61 मोहिम झाली फेल; काय होतं त्यामागचं खरं कारण? माजी शास्त्रज्ञांनी सांगितलं इस्रोचं पुढचं पाऊल काय..

PSLV-C61 Mission failure reason : PSLV-C61 मोहिमा प्रक्षेपणावेळी तिसऱ्या टप्प्यात बिघाड झाल्याने अयशस्वी ठरली. इस्रोने या अपयशाची सखोल चौकशी करण्यासाठी FAC समिती स्थापन केली आहे.

Saisimran Ghashi

PSLV-C61 Mission Update : श्रीहरीकोटामधून इस्रोने रविवारी पहाटे ५.५९ वाजता PSLV-C61 या रॉकेटची प्रक्षेपण मोहीम सुरू केली. या मोहिमेद्वारे EOS-09 हे पृथ्वी निरीक्षण करणारे उपग्रह अवकाशात सोडण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, या प्रक्षेपणादरम्यान रॉकेटच्या तिसऱ्या टप्प्यात गंभीर बिघाड झाला आणि रॉकेट नियोजित मार्गावरून भरकटले. परिणामी संपूर्ण मोहिम अपयशी ठरली.

भारताला कोणत्याही हवामानात पृथ्वीचे अचूक निरीक्षण करता यावे यासाठी हा उपग्रह उपयुक्त ठरणार होता. पण या अपयशामुळे आता इस्रोसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

अपयशानंतर इस्रोची भूमिका

अशा प्रकारच्या अपयशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो अत्यंत काटेकोरपने कार्यवाही सुरू करते. या प्रक्रियेमुळे भविष्यातील मोहिमा अधिक सुरक्षित आणि यशस्वी बनतात.

1. फेल्युअर अ‍ॅनालिसिस कमिटी (FAC) ची स्थापना

पहिल्या टप्प्यात इस्रो विविध केंद्रांतील तज्ज्ञ, अभियंते, मिशन विशेषज्ञ यांच्या सहभागाने एक ‘फेल्युअर अ‍ॅनालिसिस कमिटी’ स्थापन करते. ही समिती संपूर्ण मोहिमेदरम्यान जमा झालेल्या माहितीचा सखोल अभ्यास करते.

2. टेलिमेट्री डेटाचा सखोल अभ्यास

प्रक्षेपणादरम्यान रॉकेटच्या गती, उंची, दबाव, तापमान आणि इंजिन कार्यप्रदर्शन यांसारखे असंख्य मोजमाप संग्रहीत केले जातात. या डेटामधून गतीतील अनपेक्षित घसरण, उदाहरणार्थ ६ किमी/सेकंद वरून थेट २.४५ किमी/सेकंदपर्यंत झालेली घट आणि संबंधित उंचीतील बदल, ह्या गोष्टी FAC बारकाईने तपासते.

3. बिघाडाचा अचूक क्षण शोधणे

FAC या डेटाचा विश्लेषण करून बिघाड नेमका कोणत्या क्षणी झाला हे निश्चित करते. अपेक्षित आणि प्रत्यक्ष उड्डाण पथामध्ये फरक असेल तर तिथूनच तपासणी सुरू होते.

4. प्रणाल्या आणि यंत्रसामग्रीचे पुनरावलोकन

तिसऱ्या टप्प्यातील (PS3) बिघाडामुळे जर गतीत अचानक घसरण झाली असेल, तर त्या टप्प्यातील इंजिन, प्रपल्शन यंत्रणा आणि मार्गदर्शक प्रणालीचे लॉग्स तपासले जातात. यासोबतच ग्राउंड बेस्ड रडार आणि ट्रॅकिंग स्टेशनमधून मिळालेली माहितीही उपयोगात आणली जाते.

5. डिझाईन, उत्पादन व सॉफ्टवेअरची फेरतपासणी

रॉकेटचे डिझाईन, त्याचे उत्पादन आणि त्या दरम्यान वापरलेले सॉफ्टवेअर यांची पुन्हा तपासणी केली जाते. कोणतेही सॉफ्टवेअर बिघाड किंवा हार्डवेअरची कमतरता असल्यास ती स्पष्ट होते.

6. अंतिम अहवाल आणि शिफारशी

FAC अखेरीस सविस्तर अहवाल तयार करते. यात बिघाडाचे मूळ कारण नोंदवले जाते. ते मानवी चूक असो, यंत्रसामग्रीतील दोष असो किंवा हवामानसारखे बाहेरचे घटक. त्यानंतर भविष्यातील मोहिमांमध्ये अशा चुकांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सुधारणा सुचवल्या जातात.

याआधीही झाल्या आहेत चुका...पण मिळवले यश

1993 मध्ये PSLV-C1 मोहिमा सॉफ्टवेअर बिघाडामुळे अपयशी ठरली होती, तर GSLV CUS मधील EOS03 मोहिम टँक प्रेशरायझेशनच्या त्रुटीमुळे अयशस्वी झाली. मात्र या अपयशांमधून धडे घेत इस्रोने आपली प्रणाली अधिक सक्षम केली.

अपयशातून यशाचा मार्ग

माजी इस्रो शास्त्रज्ञ मनीष पुरोहित यांच्या मते, अशा अपयशामुळे इस्रो अधिक मजबूत बनते. प्रत्येक अपयश एक नवा धडा असतो. त्यामुळेच मंगळयान आणि चांद्रयान-2 यांसारख्या मोहिमा यशस्वी झाल्या. PSLV-C61 चे अपयश तात्पुरते असले तरी भविष्यातील मोहिमांसाठी हे एक महत्त्वाचे वळण ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बिहारमध्ये NDA मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला? कोणत्या पक्षातून किती मंत्री होणार? 'या' दिवशी शपथविधी सोहळ्याची शक्यता

Asia Cup, IND A vs PAK A: वैभव सूर्यवंशी, नमन धीर पाकिस्तानविरुद्ध बरसले! भारताने विजयासाठी ठेवलं 'इतक्या' धावांचं लक्ष्य

Viral Video: 91व्या वर्षीही करतात 12 तास ड्यूटी! फिट राहण्याचं सिक्रेट विचारताच आजोबांनी दिलं असं काही उत्तर...नेटकरीही झाले थक्क

Solapur Political : मंगळवेढ्यात काँग्रेसचा पंढरपूरप्रमाणे आघाडीसोबत लढण्याचा पॅटर्न!

मेडिक्लेम पॉलिसी घेताना अर्ज व्यवस्थित भरून देणे गरजेचे; अपुऱ्या अर्जामुळे...

SCROLL FOR NEXT