itel a49 budget smartphone launched in india with best feature check price
itel a49 budget smartphone launched in india with best feature check price  
विज्ञान-तंत्र

सर्वांना परवडेल असा itel A49 स्मार्टफोन भारतात लॉंच, पाहा किंंमत-फीचर्स

सकाळ डिजिटल टीम

itel India ने आपला नवीन फोन itel A49 लाँच केला आहे. असा दावा केला जात आहे की 6.6-इंचाचा HD+ डिस्प्ले असलेला हा भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. itel A49 मध्ये 6.6-इंचाचा HD+ IPS वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आहे. याशिवाय या फोनमध्ये 4000mAh बॅटरी देण्यात आली आहे. itel A49 ची किंमत 6,499 रुपये ठेवण्यात आली आहे. itel A49 थेट जिओ फोन नेक्स्टशी स्पर्धा करेल.

itel A49 चे स्पेसिफिकेशन

itel A49 मध्ये 6.6-इंचाचा डिस्प्ले आहे. याशिवाय, फोनमध्ये 2GB रॅमसह 32GB स्टोरेज आहे. फोनसोबत मोफत वन-टाइम स्क्रीन बदलण्याची सुविधाही उपलब्ध आहे. या itel फोनमध्ये 1.4 GHz च्या क्लॉक स्पीडसह क्वाड-कोर प्रोसेसर दिला आहे.

itel A49 मध्ये Android 11 (Go Edition) आहे. मेमरी कार्डच्या मदतीने फोनचे स्टोरेज 128GB पर्यंत वाढवता येते. फोनसोबत AI पॉवर सेव्हिंग मोड देखील आहे. सुरक्षिततेसाठी, itel A49 मध्ये फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.

कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास, itel A49 मध्ये मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये एक लेन्स 5 मेगापिक्सेल आणि दुसरा VGA आहे. सेल्फीसाठी 5 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी Dual 4G VoLTE / ViLTE उपलब्ध आहे. itel A49 क्रिस्टल पर्पल, डोम ब्लू आणि स्काय सायन रंगांमध्ये उपलब्ध असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: आनंदाची बातमी! पावसाच्या व्यत्ययानंतर बेंगळुरू-चेन्नई सामन्याला पुन्हा सुरुवात

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT