Japan Moon Mission eSakal
विज्ञान-तंत्र

Japan Moon Mission : भारतानंतर आता जपानही करणार चंद्रवारी; 'JAXA' पाठवणार स्वतःचं 'मून स्नायपर' यान

JAXA Moon Sniper : हे यान जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये चंद्रावर पोहोचेल.

Sudesh

JAXA Moon Mission : भारताने 'चांद्रयान-3' मोहीम यशस्वीरित्या फत्ते केली आहे. यानंतर आता जपानही चंद्रावर लँडर उतरवण्याच्या तयारीत आहे. जपानची अंतराळ संशोधन संस्था 'JAXA' ही येत्या दोन दिवसांमध्ये आपलं यान चंद्रावर पाठवू शकते. 'मून स्नायपर' असं या यानाचं नाव असणार आहे. हे यान जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये चंद्रावर पोहोचेल.

एका रिपोर्टमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, जपान यासाठी आपलं H2-A रॉकेट वापरणार आहे. जपानचं हे सर्वात विश्वासू रॉकेट आहे. 2001 सालापासून आतापर्यंत एकूण 42 उड्डाणांमध्ये याचा वापर करण्यात आलेला असून, केवळ एकदाच हे रॉकेट फेल झालं होतं.

सोमवारी होऊ शकतं प्रक्षेपण

खरंतर जपानच्या या यानाचं प्रक्षेपण 25 ऑगस्ट, म्हणजेच शुक्रवारी होणार होतं. मात्र, खराब हवामानामुळे ते पुढं ढकलण्यात आलं. यानंतर आता रविवार किंवा सोमवारी हे प्रक्षेपण पार पडू शकतं. जपानने यापूर्वी देखील चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न केला आहे. मात्र, हा प्रयत्न अयशस्वी ठरला होता.

स्नायपर नाव कशामुळे?

भारताने चांद्रयान-3 च्या लँडिंगसाठी एक मोठी जागा निश्चित केली होती. काही किलोमीटरचा परिसर यासाठी ठरवण्यात आला होता. मात्र, जपान हे अवघ्या 100 मीटरच्या भागामध्ये आपलं लँडर उतरवणार आहे. छोट्याशा भागात याचं अचूकपणे लँडिंग करण्यात येणार असल्यामुळे याचं नाव 'स्नायपर' ठेवण्यात आलं आहे.

जपान पाठवणार लँडर-रोव्हर

जपान पाठवत असलेल्या मून स्नायपर यानासोबत एक स्मार्ट लँडर आणि रोव्हर पाठवण्यात येणार आहे. SLIM असं या लँडरचं नाव असणार आहे. नावाप्रमाणेच हे लँडर अगदी स्लिम आहे. याची उंची केवळ 2.4 मीटर आणि लांबी 1.7 मीटर आहे. याची रुंदी 2.7 मीटर आहे. अवघ्या 700 किलो वजनाचं हे लँडर असणार आहे. विशेष म्हणजे यातील रोव्हर हे त्याहून छोटं, अगदी तळहाताएवढं असणार आहे.

चंद्रावर काय करणार?

या मोहिमेच्या माध्यमातून जपान चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करेल. चंद्राची निर्मिती कशी झाली, युनिवर्सचा विकास कसा झाला याचा अभ्यास हे रोव्हर करेल. स्नायपर यानासोबत एक एक्सरे इमेजिंग उपग्रह देखील पाठवण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Elections: महापालिका निवडणुकीत Gen Z ची एन्ट्री! नव्या विचारांची लाट येणार; मतदारांचा कल बदलणार का?

अजय अतुल यांच्या वडिलांचं नुकतंच निधन झालेलं आणि... असं तयार झालं 'तुझ्या पिरतीचा विंचू मला चावला' गाणं

Scorpio Horoscope 2026 : वृश्चिक राशीसाठी हे वर्ष कसं असेल, आव्हान पेलण्याची ताकद निर्माण करा...

Indian Army SSC Tech 2026 : भारतीय सेनेत अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी! कोणतीच परीक्षा नाही, कशी होणार निवड? पाहा संपूर्ण प्रक्रिया

Latest Maharashtra News Updates Live: अंधेरी पश्चिम विधानसभेत काँग्रेसला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT